October 29, 2026

फ्लाइटचा पाऊस! पुणे विमानतळावर पहिल्यांदाच इतकी विमानांची गर्दी, आकडे ऐकून थक्क व्हाल

0
Punelive24 News

Pune Airport |पुणे विमानतळाने आपल्या इतिहासात प्रथमच एका दिवसात सर्वाधिक विमान वाहतुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 13 एप्रिल रोजी, रविवारी एकूण २१० विमानांची ये-जा झाली. या दिवशी १०५ विमानांनी उड्डाण घेतले तर १०५ विमाने धावपट्टीवर उतरली. एकाच दिवसात एवढ्या संख्येने विमान वाहतूक होण्याची ही पहिलीच वेळ असून, या वाहतुकीतून एकूण ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. याआधी एक दिवसात २०८ विमानांची वाहतूक झाली होती, परंतु नवीन आकड्याने तो विक्रम मोडीत काढला आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामात हवाई दलाने पुणे विमानतळ प्रशासनाला २१८ स्लॉट उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी २१० स्लॉट विविध विमान कंपन्यांनी आरक्षित केले आहेत, तर उर्वरित आठ स्लॉट सध्या रिकामे आहेत. या वाढीव स्लॉटमुळे विमान कंपन्यांना अधिक उड्डाणे नियोजित करण्यास मदत झाली आहे. परिणामी, विमानतळावर प्रवाशांची गर्दी आणि प्रवासाची मागणी वाढत आहे.

उत्तम व्यवस्थापन-

रविवारी विमानतळावर प्रचंड गर्दी असूनही, पार्किंग बेच्या अडचणी निर्माण झाल्या नाहीत. कोणत्याही विमानाला ‘गो अराउंड’ म्हणजेच पुन्हा आकाशात जावे लागले नाही, याचे कारण म्हणजे व्यवस्थापनाची अचूक तयारी आणि नियोजन. सामान्यतः विमानांची संख्या वाढली की पार्किंगची अडचण निर्माण होते आणि त्यामुळे विमानांना पुन्हा हवेत जावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही तपासले जातात. मात्र या दिवशी अशी परिस्थिती उद्भवली नाही.

पुणे विमानतळाच्या व्यवस्थापनाने शहरातून विविध शहरांमध्ये सुरू झालेल्या विमान सेवांमुळे आणि प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ही प्रगती शक्य झाली आहे. लोकप्रिय मार्गांवर अधिक विमान फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमानतळाच्या वापरात आणि महत्त्वात लक्षणीय वाढ झाली आहे.

प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद-

पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले की, प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत अनेक विमान कंपन्यांनी नवीन वेळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे विमान वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ ही एक सकारात्मक संकेत असून, पुणे लवकरच एक महत्त्वाचे हवाई केंद्र म्हणून उदयास येईल, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply