October 29, 2026

समुद्रात वाहत होता पुणेकर पर्यटक! स्थानिकांच्या धाडसामुळे थरारक बचाव; घटना वाचून अंगावर येईल काटा

0
Pune Tourist Sea Rescue

Pune Tourist Sea Rescue

Pune Tourist Sea Rescue : पुण्याहून मासेमारीसाठी आलेल्या पर्यटकाचा जीव मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर थोडक्यात वाचला. समुद्रात अचानक आलेल्या उधाणामुळे तो वाहून जात असतानाच चार धाडसी स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याचा जीव वाचवला. या थरारक घटनेमुळे किनाऱ्यावर उपस्थित पर्यटक आणि स्थानिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती.

हे पण वाचा : गृहकर्ज घ्यायचंय? HDFC की SBI – कोणती बँक आहे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर? वाचा सविस्तर

ही घटना रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या गावातील भारतीय शिपयार्ड परिसरात गुरुवारी दुपारी घडली. रहिम मिसाक्शीर असं या पर्यटकाचं नाव असून ते आपल्या मुलासोबत मासे गरवण्याच्या छंदासाठी येथे आले होते. समुद्रात प्रचंड भरती असल्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला होता, मात्र त्यांनी तो दुर्लक्षित करत मासेमारीसाठी थेट किनाऱ्यापर्यंत मजल मारली.

याच वेळी एक प्रचंड लाट आली आणि मिसाक्शीर यांना समुद्राच्या प्रवाहात ओढून नेले. क्षणाचाही विलंब न करता, स्थानिक युवक अमित सावंत, अमर पवार, किरण शिंदे आणि अवधूत चव्हाण यांनी धाडसी निर्णय घेत समुद्रात उडी घेतली. लाटांच्या माऱ्यामुळे सतत खडकांवर आपटत असलेला हा पर्यटक अगदीच संकटात अडकलेला होता. मात्र या युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला बाहेर ओढून घेतलं आणि किनाऱ्यावर सुरक्षित आणलं.

या धाडसामुळे मिसाक्शीर यांचा जीव वाचला असला तरी किरकोळ जखमा झाल्या आहेत. तातडीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हे पण वाचा : पुण्यातील धरणे किती टक्के भरली? गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणात किती पाणी? वाचा महत्वाची बातमी

या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं की, काही दिवसांपूर्वी याच परिसरात कापडगाव येथील एका तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनाकडून येथे कोणतीही खबरदारीचे फलक लावण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे पर्यटक वारंवार स्थानिकांच्या सूचना दुर्लक्षित करतात, हेही गंभीर बाब आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, मिऱ्या किनाऱ्याला भरतीच्या वेळी मोठा धक्का बसतो. प्रवाह जोरदार असतो. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांनी स्थानिकांचे ऐकून योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

Leave a Reply