October 29, 2026

BSNL चा धमाकेदार प्लान, 251 रुपयांत 251GB डेटा; IPL स्ट्रीमिंगही मोफत?

0
Punelive24 (7)

Recharge Plan : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार डेटा प्लान सादर केला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना जबरदस्त फायदा होणार आहे. फक्त 251 मध्ये 251GB डेटा मिळणार असून, हा प्लान विशेषतः क्रिकेट चाहत्यांसाठी आणि जास्त डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी उपयुक्त ठरणार आहे. IPL 2025 चा आनंद घ्यायचा असेल किंवा मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि वर्क फ्रॉम होमसाठी डेटा हवा असेल, तर BSNL चा हा प्लान उत्तम पर्याय ठरू शकतो.

देशातील अनेक प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज दर वाढवले असताना, BSNL मात्र आपल्या युजर्ससाठी किफायतशीर प्लान्स आणत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणून BSNL कडे आधीच मोठा ग्राहकवर्ग आहे आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा नवीन प्लान सादर केला आहे.

IPL चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहा अडथळ्याशिवाय

 

251 रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये तब्बल 251GB हाय-स्पीड डेटा मिळत असून, याची वैधता 60 दिवसांची आहे. म्हणजेच, तुम्ही दोन महिन्यांहून अधिक काळ भरपूर इंटरनेटचा वापर करू शकता.

हा प्लान विशेषत: IPL चाहत्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. ज्या युजर्सना IPL 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहायचे आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. तसेच, हा प्लान ज्या युजर्सना मोठ्या प्रमाणावर इंटरनेट ब्राउझिंग, ऑनलाईन क्लासेस, व्हिडिओ कॉलिंग किंवा गेमिंगसाठी मोठ्या प्रमाणात डेटा हवा आहे, त्यांच्यासाठीही फायदेशीर आहे.

अनलिमिटेड कॉलिंग व SMS सुविधाही मिळणार?

 

हा एक डेटा-स्पेशल प्लान असल्यामुळे यात अनलिमिटेड कॉलिंग किंवा SMS सुविधा समाविष्ट नाही. जर तुम्हाला कॉलिंगसाठी प्लान हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला वेगळा टॉप-अप रिचार्ज करावा लागेल. तरीही, फक्त इंटरनेटसाठी स्वस्त आणि दमदार प्लान शोधत असाल, तर BSNL चा हा प्लान उत्तम पर्याय आहे.

BSNL ने आपल्या अधिकृत X (Twitter) अकाउंटवर या प्लानची माहिती दिली आहे. कंपनीच्या पोस्टनुसार, हा प्लान खास ज्या युजर्सना भरपूर डेटा लागतो त्यांच्यासाठी आणण्यात आला आहे. जर तुम्हाला हा प्लान घ्यायचा असेल, तर तो BSNL च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा BSNL Selfcare अ‍ॅपवर उपलब्ध आहे.

 

Leave a Reply