June 13, 2026

घरबसल्या फक्त एका क्लिकमध्ये घ्या दमदार इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या ‘या’ खास ऑफर बद्दल

0
Oben Rorr EZ Bike

Oben Rorr EZ Bike

Oben Rorr EZ Bike : इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यातच आता बेंगळुरूस्थित ओबेन इलेक्ट्रिक कंपनीने मोठं पाऊल उचललं आहे. ग्राहकांना घरबसल्या दमदार इलेक्ट्रिक बाईक खरेदी करता यावी यासाठी कंपनीने आपली नवी ‘Roar EZ’ ही बाईक थेट Amazon वर उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सुरु करताच अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हे पण वाचा : रविवारी हडपसरवर रेल्वे ब्लॉक! कुठल्या गाड्या रद्द, कुठल्या वेळा बदलल्या? वाचा एका क्लिकवर

पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यापूर्वी बाईक खरेदीसाठी शोरूममध्ये जावं लागायचं, तिथे वेळ खर्ची घालावा लागायचा, टेस्ट रायडसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागायची, पण आता हे सर्व झंझट टळणार आहे. ओबेन इलेक्ट्रिकने ‘डिजिटल शोरूम’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत ग्राहकांना विश्वासार्ह ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बाईक खरेदीचा मार्ग खुला केला आहे.

Roar EZ या बाईकचे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पहिल्या मॉडेलची किंमत ₹1,19,999 असून दुसऱ्या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ₹1,29,999 आहे. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीकडून ₹20,000 पर्यंतची सवलत दिली जात आहे. त्यामुळे ही बाईक केवळ स्टायलिशच नाही तर किफायतशीरही ठरते.

तांत्रिक बाबतीत बोलायचं झालं, तर Roar EZ मध्ये 3.4kWh आणि 4.4kWh क्षमतेचे दोन बॅटरी पर्याय आहेत. फुल चार्ज केल्यानंतर ही बाईक तब्बल 175 किलोमीटर अंतर पार करू शकते. फास्ट चार्जिंगसह एलएफपी बॅटरी या बाईकला अधिक टिकाऊ बनवते. तिचा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे आणि केवळ 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितासचा वेग पकडते. 52 Nm टॉर्कसह ही बाईक परफॉर्मन्सच्या बाबतीतही आघाडीवर आहे.

हे पण वाचा : होम लोन घेता? ‘या’ चुका टाळा, नाहीतर लाखोंचं नुकसान होईल! वाचा सविस्तर

डिझाईन आणि सेफ्टीमध्येही ही बाईक कुठेच कमी नाही. जिओफेन्सिंग, थेफ्ट प्रोटेक्शन, युनिफाइड ब्रेक असिस्ट आणि ड्राइव्ह असिस्ट सिस्टम ही आधुनिक वैशिष्ट्ये तिच्या स्मार्टनेसला पूरक ठरतात. ही बाईक ARX प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे ती भारतीय रस्त्यांवर सहज चालवता येते.

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading