Realme चे दोन नवे 5G फोन लाँच; 120Hz डिस्प्ले, 50MP कॅमेरासह पहिल्याच दिवशी दमदार सूटही
Realme Narzo 80 Series | Realme ने भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली Narzo 80 सिरीज सादर केली असून या अंतर्गत दोन नवीन 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत – Realme Narzo 80 Pro 5G आणि Realme Narzo 80x 5G. बजेट श्रेणीत हे दोन्ही फोन आकर्षक फीचर्स, दमदार बॅटरी आणि चांगल्या परफॉर्मन्ससह येतात. MediaTek चिपसेट, जलद चार्जिंग आणि प्रगत कॅमेरा सेटअप यामुळे हे फोन ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
Realme Narzo 80 Pro 5G
Realme Narzo 80 Pro 5G मध्ये 6.77-इंचाचा फुल HD+ वक्र AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. हा फोन MediaTek Dimensity 7400 SoC प्रोसेसरने सुसज्ज असून यात 12GB पर्यंत RAM उपलब्ध आहे. Android 15 वर आधारित Realme UI 6 या फोनमध्ये मिळते. यामध्ये 6,050mm² VC कूलिंग सिस्टम दिली गेली असून BGMI गेम 90fps वर चालवण्याची क्षमता यात आहे. कॅमेराच्या बाबतीत, या फोनमध्ये 50MP OIS प्रायमरी कॅमेरा, 2MP सेकंडरी कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी 6,000mAh क्षमतेची असून 80W SuperVOOC चार्जिंग आणि 65W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme Narzo 80x 5G
Realme Narzo 80x 5G मध्ये 6.72-इंचाचा फ्लॅट LCD डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz असून, हा फोन MediaTek Dimensity 6400 चिपसेटसह येतो. यामध्ये 50MP रियर कॅमेरा, 2MP दुसरा कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोन IP69 रेटिंगसह येतात. Narzo 80 Pro ला IP66, IP68 आणि MIL-STD-810H प्रमाणित सुरक्षा दिली आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, Narzo 80 Pro 5G चा 8GB + 128GB बेस व्हेरिएंट ₹19,999 मध्ये, 8GB + 256GB ₹21,499 मध्ये आणि 12GB + 256GB ₹23,499 मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन नायट्रो ऑरेंज, रेसिंग ग्रीन आणि स्पीड सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे. Narzo 80x 5G चा 6GB + 128GB व्हेरिएंट ₹13,999 मध्ये तर 8GB + 128GB ₹14,999 मध्ये उपलब्ध आहे. याचे रंग पर्याय म्हणजे डीप ओशन आणि सनलिट गोल्ड.
Realme Narzo 80 Pro ची विक्री 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, तर Narzo 80x 5G ची विक्री 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. दोन्ही फोनवर पहिल्या सेलमध्ये ₹2,000 ची सूट मिळणार आहे. कंपनीने विद्यार्थ्यांसाठी Narzo 80 Pro वर ₹1,299 ची अतिरिक्त सूट देखील दिली आहे.
या दोन्ही फोनमध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB Type-C पोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. Realme च्या Narzo 80 सिरीजमुळे भारतीय ग्राहकांना स्वस्तात उत्तम परफॉर्मन्स मिळणार आहे.
