October 29, 2026

राज्यात पुढील तीन दिवस कसा असेल पाऊस? IMD चा अंदाज धक्कादायक; वाचा सविस्तर

0
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आता हवामान विभागाने काहीसा दिलासा देणारा पण सतर्क करणारा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम ओसरल्यामुळे अनेक भागांमध्ये आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्यवान, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर तुलनेने कमी राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही दिवस शेतकामात खंड पडू शकतो तर पर्यटनावरही परिणाम होऊ शकतो. मात्र, यंदाच्या सुरुवातीच्या दमदार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला असल्याने सध्या पाणीटंचाईचा धोका नाही.

विशेषतः घाटमाथ्याचे भाग, कोकण, गोवा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी, भोर, वेल्हा आदी भागांमध्ये घाटात पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि मध्य महाराष्ट्रातील जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मुंबई परिसरात ढगाळ हवामान असून काही उपनगरांत सकाळपासून हलक्या सरी पडल्या आहेत. येत्या काही तासांत जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात मात्र आज पावसाने विश्रांती घेतली असून हवामान उबदार आणि दमट आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शहरातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून शहरासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही.

हे पण वाचा : 2025 च्या उर्वरित महिन्यांत ‘या’ 3 राशींना अपार यश मिळणार; बाबा वेंगानी केलं सर्वांत मोठं भाकीत

पुण्याच्या खेड तालुक्यातील इंदिरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून आंबेगाव व खेड या तालुक्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. या पावसामुळे पाणीटंचाई टळली असून शेतीसाठीही चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply