October 29, 2026

राज्यात मुसळधार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे

0
Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पावसाची रिपरिप पुन्हा एकदा गडगडाटात सुरू झाली असून हवामान खात्याने काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह पुणे, नाशिक, रायगड, सातारा, कोल्हापूर व सांगली परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.

हे पण वाचा : आज प्रवास टाळा! या राशींसाठी धोका; कोणाला मिळणार गोड बातमी?

राज्यात काही दिवसांपासून काही भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान पुन्हा एकदा बदलत असून, कोसळणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा पसरला आहे. पुण्यातील खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाल्याने धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे मुठा आणि भीमा नदीकाठच्या गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

पंढरपूर परिसरात मागील २४ तासांत जोरदार पावसामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. स्थानिक प्रशासनाने नदीनदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी लहान पूल आणि संपर्क मार्ग पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. विदर्भात देखील गडचिरोली व चंद्रपूरसारख्या भागात नद्या भरून वाहत आहेत.

हे पण वाचा : अमेरिकेची धमकी आणि भारतात बाजार कोसळतोय! ट्रम्प टॅरिफचा दणका सुरू

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, पुणे, रायगड व नाशिकमध्ये नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply