अवघ्या महिन्याभरात Maruti Suzuki ची रेकॉर्डब्रेक विक्री, कोणत्या सेगमेंटला मिळाली सर्वाधिक पसंती?
Car Sales | Maruti Suzuki ने मार्च 2025 मध्ये भारतीय बाजारात 1.50 लाख पेक्षा जास्त कार्सची विक्री केली. या विक्रीत सर्वाधिक वाढ SUV आणि MPV सेगमेंटमध्ये दिसून आली आहे. Maruti Suzuki ने 150,743 युनिट्सची विक्री केली, ज्यामध्ये SUV आणि MPV व्हेइकल्सच्या विक्रीचा मोठा वाटा होता. (Car Sales)
2024 च्या तुलनेत किती झाली विक्री?
मार्च 2025 मध्ये Maruti Suzuki ने 1.50 लाख युनिट्सची विक्री केली, जे 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 1,52,718 युनिट्सच्या तुलनेत थोड्या कमी आहे. यातून असे दिसून येते की, कंपनीच्या काही सेगमेंट्समध्ये विक्रीत कमी झाली आहे.
SUV आणि MPV कार्सला सर्वाधिक मागणी
कंपनीच्या SUV आणि MPV सेगमेंटमध्ये विक्रीत मोठी वाढ दिसून आली. मार्च 2025 मध्ये ब्रेझा, अर्टिगा, फ्रॉंक्स, ग्रँड विटारा, इनविक्टो, जिम्नी आणि XL6 कार्सच्या 61,097 युनिट्सची विक्री झाली, तर 2024 मध्ये ही संख्या 58,436 होती. (Car Sales)
हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडान विक्री
मार्च 2025 मध्ये Maruti ने 66,906 युनिट्स हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडान कार्स विकल्या, ज्यात बलेनो, सिलेरियो, डिजायर, स्विफ्ट आणि वैगन आर समाविष्ट आहेत. 2024 मध्ये ह्याच सेगमेंटमध्ये 68,844 युनिट्सची विक्री झाली होती.
OEM भागीदारी
Maruti ने टोयोटाशी भागीदारी करून काही वाहने इतर OEMs ला पुरवली आहेत. मार्च 2025 मध्ये 6,882 युनिट्स इतर OEM कडे पाठवले गेले, तर 2024 मध्ये ही संख्या 4,974 होती.
