एका चमच्याने उलगडलं 1114 वर्षाचं रहस्य! शेतात मिळालं प्राचीन सोनं-चांदी, वाचून थक्क व्हाल!
Viking Treasure Scotland
Viking Treasure Scotland : एखाद्या ऐतिहासिक थरारपटासारखी ही गोष्ट खरोखरच घडली आहे. शेतात नेहमीप्रमाणे फावड्याने काम करत असताना जमिनीत काहीतरी चमकतंय असं लक्षात आलं आणि त्या चमकत्या वस्तूच्या शोधात एक व्यक्ती तब्बल 1114 वर्षे जुना वायकिंग काळातील ‘खजिना’ उघडतो, हे ऐकूनही अविश्वसनीय वाटेल! पण स्कॉटलंडमधील डेरिक मॅक्लेनन या शेतकऱ्याच्या बाबतीत हे वास्तवात घडलं आहे.
२०१४ मध्ये ही ऐतिहासिक घटना घडली. डेरिक त्यांच्या जमिनीत नेहमीप्रमाणे मेटल डिटेक्टर घेऊन फेरफटका मारत होते. अचानक एका ठिकाणी डिटेक्टरने जोरदार सिग्नल दिला. त्यांनी त्या जागी थोडंसं खोदलं आणि प्रथम एक चांदीचा चमचा सापडला. चमचा तसा सामान्य वाटत होता, पण जेव्हा त्यांनी त्याची स्वच्छता केली, तेव्हा त्यावर असलेलं क्रॉसचं चिन्ह नजरेत आलं. हे पाहताच डेरिकला समजलं की, त्यांनी काहीतरी फारच वेगळं आणि ऐतिहासिक शोधून काढलंय.
यानंतरच्या खोदकामात हळूहळू सोनं, चांदी, मौल्यवान दागिने, हस्तकलेच्या वस्तू, कपड्यांमध्ये गुंडाळलेलं एक सोन्याचं भांडं आणि अगदी सोन्याच्या पक्ष्याच्या आकाराचा पिन देखील सापडला. हा सगळा खजिना तब्बल ५ किलो वजनाचा होता! हे सारे वस्तू इ.स. ९०० च्या सुमारास स्कॉटलंडमध्ये आलेल्या वायकिंग लुटारूंनी पुरल्या होत्या. परिस्थिती इतकी बिकट असावी की त्यांनी घाईघाईत खजिना जमिनीत पुरून टाकला आणि पुन्हा कधीही तो शोधू शकले नाहीत.
या शोधामुळे डेरिक मॅक्लेनन अचानक चर्चेत आले. स्कॉटलंडच्या कायद्यानुसार, जर एखाद्या नागरिकाला अशा ऐतिहासिक खजिन्याचा शोध लागला, तर सरकार त्याचे मूल्यांकन करून शोधकर्त्याला योग्य बक्षीस देतं. त्यानुसार, राष्ट्रीय संग्रहालय स्कॉटलंडने डेरिक यांना तब्बल २० लाख पाउंड – म्हणजे जवळपास ४० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले!
हा शोध आज ‘गॅलोवे होर्ड’ या नावाने ओळखला जातो. ब्रिटन आणि आयर्लंडमधील वायकिंग युगाशी संबंधित तो सर्वात महत्त्वाचा शोध मानला जातो. या खजिन्यात असलेल्या वस्तू केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर कलात्मक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अमूल्य आहेत.
