ग्लॅमरच्या दुनियेत झळकणाऱ्या रश्मिकाला ‘ही’ गोष्ट फार बोचते; खुलासा वाचून तुमचेही डोळे पाणावतील!
Rashmika Mandanna
Rashmika Mandanna : सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ही एक हिट मशीन बनली आहे. ‘पुष्पा’, ‘अॅनिमल’, ‘छावा’, ‘सिकंदर’ आणि नुकताच रिलीज झालेला ‘कुबेरा’ या सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समधून तिची घोडदौड सुरू आहे. पण या यशाच्या झगमगाटामागे एक भावनिक किंमतही ती देत आहे, जी तिने अलीकडे एका मुलाखतीत उघड केली.
रश्मिकाने नॉड मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लहान बहिणीबद्दल बोलताना आपली वेदना व्यक्त केली. “माझी सख्खी बहीण माझ्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे. ती आता १३ वर्षांची आहे आणि मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा ती अगदी लहान होती. आज ती जवळपास माझ्याच उंचीची झाली आहे, पण मी तिचं लहानपण अनुभवूच शकले नाही. मी तिला वाढताना बघितलेलंच नाही,” असं सांगताना रश्मिकाच्या आवाजात हळुवार खंत होती.
या मुलाखतीत पुढे ती म्हणते, “दीड वर्ष झालं मी घरी गेलेले नाही. व्यावसायिक कामामुळे इतकी व्यग्र आहे की, ना बहिणीला भेटता येतं, ना मित्रमैत्रिणींना. पूर्वी तरी ते त्यांच्या प्लॅन्समध्ये मला सामील करायचे, आता तेही करत नाहीत. एकटेपणाची जाणीव अधिक तीव्र होते.”
आईने एकदा दिलेला सल्लाही रश्मिकाने शेअर केला – “आई म्हणायची की व्यावसायिक आयुष्यात यश हवं असेल, तर वैयक्तिक आयुष्याचं बलिदान द्यावं लागतं. आणि जर वैयक्तिक आयुष्य हवं असेल, तर मग करिअरचा त्याग करावा लागतो.” पण रश्मिकाचं म्हणणं आहे की, ती या दोघांत समतोल साधायचा सातत्याने प्रयत्न करते, जरी ते नेहमीच शक्य होत नाही.
