June 13, 2026

कार थांबवली, निर्माल्य टाकलं आणि क्षणात पत्नीने नवऱ्याच्या डोळ्यादेखत नदीत उडी घेत संपवलं आयुष्य; नेमकं काय घडल?

0
Nagpur Suicide Case

Nagpur Suicide Case

Nagpur Suicide Case : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील नेरी पुलावर शनिवारी दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका तरुण विवाहित महिलेनं आपल्या पतीसमवेत पुलावर कार थांबवून निर्माल्य टाकण्याच्या निमित्ताने काही क्षण घालवले आणि अनपेक्षितपणे नदीत उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं. ही घटना पतीच्या डोळ्यांदेखत घडल्याने त्याचा मानसिक धक्का शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

हे पण वाचा : ग्लॅमरच्या दुनियेत झळकणाऱ्या रश्मिकाला ‘ही’ गोष्ट फार बोचते; खुलासा वाचून तुमचेही डोळे पाणावतील!

रामटेक तालुक्यातील काचूरवाही गावाची रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) ही सध्या पती विजय साकोरे यांच्यासोबत नागपूरच्या मानेवाडा परिसरात वास्तव्यास होती. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास दोघंही गावाकडे निघाले होते. मार्गामध्ये कन्हान नदीवरील नेरी पुलावर त्यांनी निर्माल्य टाकण्यासाठी कार थांबवली. त्या दोघांनी काही वेळ पुलावर घालवला, सेल्फी काढला आणि क्षणातच ज्ञानेश्वरीने कोणतीही पूर्वसूचना न देता पुलावरून नदीत उडी घेतली.

पती विजय यांना हे दृश्य पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांनी तात्काळ आरडाओरड केली, मदतीसाठी हाकाही मारली, पण त्या वेळी आजूबाजूला कोणीच नव्हतं. पतीच्या डोळ्यांसमोर पत्नीचा जीवनप्रवाह थांबला, पण तो काहीच करू शकला नाही. काही वेळात नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू झाली.

शनिवारी सायंकाळपर्यंत अथक प्रयत्न करूनही ज्ञानेश्वरीचा थांगपत्ता लागला नाही. अंधारामुळे शोध थांबवावा लागला. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र या दुर्दैवी घटनेमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद वा मानसिक तणाव या कारणांची शक्यता बोलली जात आहे.

हे पण वाचा : गुरु पौर्णिमेच्या दिवशी ‘या’ ५ राशींवर गुरूंची विशेष कृपा, आयुष्यात येणार मोठा बदल; वाचा सविस्तर

या घटनेनंतर पोलिसांनी विजय साकोरे यांचा जबाब नोंदवला असून, सखोल तपास सुरू आहे. ज्ञानेश्वरीने का आणि कोणत्या मनःस्थितीत हे टोकाचं पाऊल उचललं, याचा मागोवा घेतला जात आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading