June 17, 2026

१००० कोटींचं घर! मुंबईतल्या ‘या’ विभागात झाली ऐतिहासिक खरेदी, पाहा कोणी केलं खरेदी?

0
Mumbai Luxury Home Sale

Mumbai Luxury Home Sale

Mumbai Luxury Home Sale : मुंबई म्हणजे स्वप्ननगरी, पण इथे घर घेणं सामान्य माणसासाठी स्वप्नच उरतंय. कारण घरांच्या किमती आता आकाशाला भिडल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात, एका घराची किंमत तब्बल १००० कोटी रुपये असल्याची चर्चा सुरू असतानाच, गोरेगावसारख्या विभागातही कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याचं समोर आलंय.

हे पण वाचा : 9 जुलैला संपूर्ण भारत अंधारात बुडणार? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

सध्या चर्चेचा विषय ठरलेला सौदा म्हणजे प्रसिद्ध टीव्ही दिग्दर्शक आतिश कपाडिया यांची गोरेगावमधील आलिशान अपार्टमेंटची खरेदी. त्यांनी त्यांच्या पत्नी अ‍ॅलिसन कपाडिया यांच्या नावावर हे घर विकत घेतलं असून, या घराची किंमत आहे तब्बल 15.31 कोटी रुपये!

ही मालमत्ता ओबेरॉय रिअल्टीच्या ‘एलिसियन’ प्रकल्पात असून तिचं क्षेत्रफळ ३,०३० चौरस फूट इतकं मोठं आहे. त्यासोबत तीन खासगी पार्किंग स्पेसही दिल्या आहेत. इतक्या मोठ्या व्यवहारासाठी ९१.८६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३ लाख रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.

ही माहिती स्क्वेअरयार्ड्स रिअल इस्टेट डेटाबेस आणि नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या अधिकृत वेबसाइटवरून मिळाली आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत या प्रकल्पात १०३५ कोटी रुपयांच्या ११६ मालमत्ता विक्री नोंदविण्यात आल्या आहेत.

गोरेगाव हे पूर्वी केवळ मध्यमवर्गीयांसाठी ओळखलं जात असलं, तरी आता ‘दुसरं वांद्रे’ म्हणून नावारूपाला येतंय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड, आणि गोरेगाव रेल्वे स्टेशनमुळे शहरातील कुठेही सहज पोहोचता येतं. याशिवाय, इनॉर्बिट आणि इन्फिनिटी मॉल्स, फिल्मसिटी, कॉर्पोरेट ऑफिसेस आणि स्टुडिओजमुळे हे क्षेत्र क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी हॉटस्पॉट बनलं आहे.

हे पण वाचा : ब्रेकिंग! सौदी अरेबिया थरथरला! THAAD प्रणाली सक्रीय, युद्धजन्य स्थिती निर्माण

आतिश कपाडिया कोण?

‘खिचडी’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या हिट मालिकांमागचा चेहरा म्हणजे आतिश कपाडिया. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांनी भारतीय टेलिव्हिजनवर मोठा ठसा उमटवला आहे. हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्सच्या सह-संस्थापक म्हणून त्यांनी दर्जेदार आणि विनोदी मालिकांची निर्मिती केली. त्यांच्या कामाची ओळख म्हणजे संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणाऱ्या सहजसुंदर कथा.

कोटींच्या घरात काय सुविधा?

एलिसियन प्रकल्पातील घरांमध्ये भव्य लॉबी, हाय-टेक सिक्युरिटी, फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, मल्टीपरपज हॉल, ओपन डेक आणि हिरवाईने भरलेली सुंदर परिसररचना आहे. या इमारतीतून मुंबईचं स्कायलाइनही स्पष्ट दिसतं.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading