ब्रेकिंग! सौदी अरेबिया थरथरला! THAAD प्रणाली सक्रीय, युद्धजन्य स्थिती निर्माण
Saudi Arabia THAAD Activation
Saudi Arabia THAAD Activation : इराण आणि इस्रायल यांच्यातील १२ दिवसांच्या तणावपूर्ण संघर्षानंतर जरी युद्धविराम झाला असला, तरी मिडल ईस्टमधील वातावरण अजूनही अस्थिरच आहे. या संघर्षाचे पडसाद आता इतर आखाती देशांमध्ये उमटू लागले आहेत. विशेषतः कतरमधील अमेरिकी एअरबेसवर इराणकडून झालेल्या मिसाइल हल्ल्यानंतर सौदी अरेबियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हीच भीती लक्षात घेऊन सौदी अरेबियाने अमेरिकेच्या अत्याधुनिक THAAD (Terminal High Altitude Area Defense) एअर डिफेन्स प्रणालीला सक्रीय केले आहे. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती अधिकृतरित्या जाहीर केली असून, देशाची हवाई सुरक्षा ‘अभेद्य’ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
THAAD प्रणाली म्हणजे नेमकं काय?
ही प्रणाली मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल्सना हवेतच नष्ट करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे. अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांनी ती यापूर्वीच वापरात आणली आहे. आता सौदी अरेबियासारखा तेलसंपन्न देशही तिच्या मदतीने संभाव्य हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्याच्या तयारीत आहे.
सौदी अरेबियाला ही भीती उगाच वाटत नाही. कारण कतर, कुवैत, बहरीन, जॉर्डन आणि सौदी अरेबिया – या सर्व देशांमध्ये अमेरिकी लष्करी बेस आहेत. यामुळे या देशांना थेट हल्ल्याचा धोका आहे, आणि इराणसोबत सौदीचे दीर्घकाळचे तणावपूर्ण संबंध ही परिस्थिती अधिक धोकादायक बनवतात.
भारतही सज्जतेकडे वाटचाल करत आहे
दरम्यान, भारतानेही आपल्या हवाई सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या भारताकडे S-400 ही रशियन एअर डिफेन्स प्रणाली आहे, जी 400 किमी अंतरावरून येणाऱ्या कोणत्याही हवाई हल्ल्याचा प्रतिकार करू शकते. पाकिस्तानकडून झालेल्या अनेक हवाई हल्ल्यांना याच प्रणालीने निष्फळ ठरवलं होतं.
हे पण वाचा : तिशीनंतर मिळतो राजयोग! ‘या’ तारखेला जन्मलेल्यांचं नशीब चमकतं; जगतात एकदम राजेशाही थाटात
आता भारत S-500 या आणखी प्रगत प्रणालीच्या खरेदीचा विचार करत आहे. S-500 मध्ये हायपरसोनिक मिसाइल्स रोखण्याचीही क्षमता आहे. म्हणजेच, भविष्यातील अधिक वेगवान आणि धोकादायक हल्ल्यांनाही ही प्रणाली तोंड देऊ शकते.
जागतिक स्तरावर सुरक्षेचा नवा युगाचा आरंभ?
इराण-इस्रायल संघर्ष, अमेरिका-इराण तणाव आणि आखाती देशांतील असुरक्षितता यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया आणि आजूबाजूचे देश हाय अलर्टवर आहेत. सौदी अरेबियाने घेतलेला THAADचा निर्णय हे केवळ सुरक्षेचं पाऊल नसून, एक जागतिक संकेत मानला जातो – की युद्ध कितीही दूर असलं, तरी त्याची छाया आजूबाजच्या प्रत्येक देशावर पडते.
