प्रवाशांसाठी वाईट बातमी; रेल्वे स्थानकावरील वडापाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला
Railway Station Food Price Hike
Railway Station Food Price Hike : रेल्वे प्रवासात फलाटावर गरमागरम वडापाव खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. पण आता या वडापावच्या किंमतीत थेट ५ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच, जो वडापाव कालपर्यंत १३ रुपयांना मिळत होता, त्यासाठी आता १८ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ जुलैपासून अंमलात आली असून पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुधारित दरपत्रक जाहीर केलं आहे.
हे पण वाचा : १००० कोटींचं घर! मुंबईतल्या ‘या’ विभागात झाली ऐतिहासिक खरेदी, पाहा कोणी केलं खरेदी?
प्रवाशांना बसली महागाईची झळ
प्रवासादरम्यान वेळ घालवण्यासाठी आणि भूक शमवण्यासाठी प्रवासी फलाटांवरच वडापाव, समोसा, भेळ, पफ असे पदार्थ खरेदी करतात. पण आता या सर्व खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. “एवढ्या महागाईत रेल्वे स्थानकावरही दरवाढ? आता पोट आणि पाकिट यामध्ये समतोल साधणं कठीण झालंय,” असं एका प्रवाशानं सांगितलं.
किंमतीत मोठा बदल – काय महागलंय?
नवीन दरपत्रकानुसार आता फक्त वडापाव नव्हे, तर इतर खाद्यपदार्थही महागले आहेत –
वडापाव – ₹१८ (पूर्वी ₹१३)
दाबेली – ₹२०
शेवपुरी – ₹४५
चायनीज भेळ – ₹३०
व्हेज पफ – ₹३५
व्हेज हॉटडॉग – ₹३५
व्हेज चिज टोस्ट सँडविच – ₹५०
याशिवाय, सरबताच्या दरात nominal कपात करण्यात आली असली तरी त्याचं प्रमाण घटवलं गेलं आहे. उदा., लिंबू किंवा कोकम सरबत ६ ऐवजी ५ रुपयांना मिळेल, पण त्याचं प्रमाण २००ml वरून १५०ml इतकं कमी करण्यात आलंय.
हे पण वाचा : 9 जुलैला संपूर्ण भारत अंधारात बुडणार? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
स्थानकांवरील विक्रेत्यांनी महागाईचा हवाला देत गेल्या काही महिन्यांपासून दरवाढीची मागणी केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, गॅस, तेल, कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे नाईलाजाने दर वाढवावे लागले. रेल्वे प्रशासनानेही त्यांच्या या मागणीला मान्यता दिली.
