June 17, 2026

9 जुलैला संपूर्ण भारत अंधारात बुडणार? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

0
9 July Power Outage India

9 July Power Outage India

9 July Power Outage India : ९ जुलै २०२५ रोजी संपूर्ण भारतात वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. कारण, देशभरातील सुमारे २७ लाख वीज कर्मचारी आणि अभियंते एकाच दिवशी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे.

हे पण वाचा : ब्रेकिंग! सौदी अरेबिया थरथरला! THAAD प्रणाली सक्रीय, युद्धजन्य स्थिती निर्माण

उत्तर प्रदेश सरकारने पूर्वांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड (PVVNL) आणि दक्षिणांचल विद्युत वितरण निगम लिमिटेड (DVVNL) या दोन सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्या मिळून राज्यातील ७५ पैकी ४२ जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठ्याचं काम पाहतात. सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध होत असून, त्याविरोधात देशभरातील वीज कर्मचारी एकवटले आहेत.

ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितलं की, “खाजगीकरणाचा हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नाही, तर याचे परिणाम देशभरातील वीज व्यवस्थेवर होतील. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम बंद करतात, तर वीज उत्पादन, ट्रान्समिशन आणि वितरण या तिन्ही स्तरांवर गंभीर परिणाम होऊ शकतात.”

या संपाचं आवाहन राष्ट्रीय वीज कर्मचारी आणि अभियंते समन्वय समिती (NCCOEEE) ने केलं आहे. ९ जुलै रोजी मुंबई, पुणे, नागपूर, कोलकाता, भोपाळ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, जयपूर, लखनऊ यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये निदर्शने आणि मोर्चे काढले जाणार आहेत.

हे पण वाचा : काय सांगता? फक्त ‘या’ एका कारणामुळे मुंबईतील तरुणीने नाकारली अमेरिकेतील ६४ लाखांची नोकरी

राज्य सरकारच्या मते, वीज कंपन्यांमध्ये वारंवार तोटा, जुनी आणि निकृष्ट ट्रान्समिशन यंत्रणा आणि व्यवस्थापनातील अकार्यक्षमता यामुळे खासगी भागीदारी किंवा खाजगीकरण अपरिहार्य बनलं आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी सरकारने खाजगी गुंतवणुकीसाठी निविदा जाहीर केल्या होत्या. या निर्णयाचा उद्देश वीज क्षेत्रात सुधारणा करणे, नवे तंत्रज्ञान आणणे, आणि ट्रान्समिशन नेटवर्कला मजबूत करून वीज तोटा कमी करणे असा सांगितला जातो. दिल्ली आणि ओडिशा यांसारख्या राज्यांमध्ये अशा खाजगी-सार्वजनिक भागीदारीचे प्रयोग यापूर्वी यशस्वी ठरले आहेत, अशी सरकारची भूमिका आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading