October 30, 2026

फक्त ₹134 मध्ये खरेदी करा, सरकारी कंपनीचा शेअर 23% उंचावणार

0
IRFC Share Price Target 2025

IRFC Share Price Target 2025

IRFC Share Price Target 2025 : भारतीय शेअर बाजारात सोमवारी पुन्हा तेजी पाहायला मिळाली असून, विशेष लक्ष वेधून घेतला तो म्हणजे सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) चा शेअर. सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच या स्टॉकने हळूहळू चढा घेत 134.25 रुपयांवर ट्रेडिंग करत मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, पुढील काही महिन्यांत या शेअरमध्ये तब्बल 23% पर्यंतचा परतावा मिळण्याची शक्यता असल्याने अनेक ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणुकीची शिफारस दिली आहे.

हे पण वाचा : रिलायन्सचा इतिहासातला सर्वात मोठा नफा, तरी शेअर्स पडले? वाचा नेमकं कारण काय?

सोमवारी, 21 जुलै 2025 रोजी बीएसई सेन्सेक्स 257.11 अंकांनी वाढून 82,014.84 अंकांवर पोहोचला, तर निफ्टी 65.40 अंकांची तेजी नोंदवत 25,033.80 वर स्थिरावला. या वाढत्या वातावरणात IRFC सारख्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स अधिकच आकर्षक ठरत आहेत.

IRFC चा शेअर आज सकाळी 134.01 रुपयांवर उघडला होता आणि दिवसभरात 135.20 रुपयांचा उच्चांक गाठला. तर शेअरचा निच्चांकी दर 132.71 रुपये इतका होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1.75 लाख कोटी रुपयांच्या घरात असून, ती सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या आर्थिक कंपन्यांमध्ये गणली जाते.

गेल्या 52 आठवड्यांमध्ये या स्टॉकने 209.20 रुपयांपर्यंत उच्चांक गाठला होता, तर नीचांकी पातळी 108.04 रुपयांपर्यंत खाली गेली होती. म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक अनेकदा परताव्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरलेला आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रेल्वेच्या वाढत्या भांडवली खर्चासाठी IRFC ची भूमिका अधिक महत्त्वाची होत चालली आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलात आणि नफ्यात सातत्याने वाढ अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे, काही ब्रोकरेज कंपन्यांनी IRFC चा टार्गेट प्राईस सुमारे 165-170 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच आजच्या किंमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना अंदाजे 23% परतावा मिळू शकतो.

IRFC ही भारतीय रेल्वेच्या विविध प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी कंपनी असून तिची आर्थिक घडी मजबूत मानली जाते. सरकारच्या धोरणात्मक पातळीवरूनही रेल्वे क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत दिले गेले आहेत. त्यामुळे या कंपनीचा व्यवसाय आणखी विस्तारेल, अशी शक्यता आहे.

हे पण वाचा : ५७० रुपयांचा शेअर थेट ७४० वर! Anthem IPO ने दिला मोठा रिटर्न

अर्थशास्त्रज्ञांच्या मते, अशा स्थिर उत्पन्न आणि सरकारी पाठबळ असलेल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे सुरक्षित ठरू शकते. त्यात IRFC सारखा शेअर जेव्हा चांगला टार्गेट प्राईस आणि स्वस्त किंमतीत मिळत असेल, तेव्हा गुंतवणूकदारांनी संधीचा फायदा घेणे योग्य ठरते.

Leave a Reply