October 18, 2026

पुण्यात पुन्हा सोन्याचे दर गगनाला भिडले, चांदीही शंभरीपार; एका क्लिकवर वाचा आजचे ताजे दर

0
Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून स्थिर वाटणाऱ्या सोन्याच्या बाजाराने आज बुधवारी अचानक उसळी घेतली आणि सर्वसामान्य ग्राहकांना धक्का दिला. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर थेट ₹९८,५०० पर्यंत पोहोचला असून २२ कॅरेट सोनंही ₹९०,३०० रूपयांवर गेलं आहे. दररोज बदलणाऱ्या या सोन्याच्या किमतींनी गृहिणीपासून लग्नसराईची तयारी करणाऱ्या कुटुंबांपर्यंत सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे.

हे पण वाचा : पुण्यातील सातबारा उताऱ्यांची मोठी चौकशी सुरू! तहसीलदार-प्रांताधिकारी अडचणीत? ५ वर्षांच्या नोंदींची तपासणी

फक्त सोनं नाही, तर चांदीही यावेळी मागे राहिलेली नाही. एक किलो चांदीचा दर ₹१,१०,७०० वर गेला आहे. कालच्या तुलनेत चक्क तीन हजार रूपयांची वाढ झाल्यानं चांदीच्या बाजारातही धडकी भरली आहे. सोनं-चांदीच्या किमतींच्या या धावपळीचा परिणाम सराफा दुकानदारांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांनाच जाणवू लागला आहे.

या दरवाढीमागे जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलर-रुपया विनिमय दरातील चढ-उतार आणि देशांतर्गत कररचना ही मुख्य कारणं सांगितली जात आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि मध्यपूर्वेतील राजकीय अस्थैर्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली असून त्याचा थेट परिणाम भारतातील दरांवर झाला आहे. शिवाय, भारतात सणासुदीची चाहूल लागत असल्यानं मागणी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी गृहित धरला आहे.

पुण्यातील एका अनुभवी सराफा व्यापाऱ्याने सांगितलं, “गेल्या आठवड्याभरात ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी थोडा वेळ थांबावं, अशी अपेक्षा केली होती. पण आजचा दर बघता त्यांना पश्चात्ताप वाटतोय. आगामी काही दिवसांत किंमती आणखी वाढू शकतात.”

हे पण वाचा : सर्वात मोठी बातमी! हिंजवडीत नैसर्गिक नाले बुजवणाऱ्यांवर कारवाई होणार; पीएमआरडीएने उचललं कठोर पाऊल

सोनं भारतीय घरांमध्ये केवळ दागिना नसून, ती सुरक्षित गुंतवणुकीची खात्री मानली जाते. त्यामुळे अशा प्रकारची दरवाढ केवळ खरेदी करणाऱ्यांनाच नव्हे, तर गुंतवणूकदारांनाही अधिक खर्चिक वाटते. लग्नसराई जवळ आल्यामुळे अनेक कुटुंबं आधीच बजेट आखून ठेवत असतात. मात्र, अशा दरवाढीमुळे त्यांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading