लग्नाआधी मुलाचा पगार नाही, CIBIL स्कोर विचारतात! आजच्या पिढीचा नवा ट्रेंड
CIBIL Score For Marriage
CIBIL Score For Marriage : एकेकाळी लग्नाआधी मुलगा-मुलगी यांची कुंडली, घराणं आणि नातेसंबंध तपासले जात. त्यात आता ‘सिबिल स्कोअर’ची भर पडली आहे. एखाद्याचं आर्थिक आरोग्य म्हणजेच त्याचा CIBIL Score आता लग्न ठरवताना निर्णायक ठरत आहे. योग्य जोडीदार शोधताना केवळ स्वभाव, घरची परिस्थिती किंवा नोकरी महत्त्वाची राहिलेली नाही, तर आता क्रेडिट स्कोअरही ‘लग्नाच्या जोडीदार’ निवडीत महत्वाची भूमिका बजावत आहे.
हे पण वाचा : व्हिडिओ व्हायरल झाला अन् पुण्यातील गुडलक कॅफे बंद! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
देशभरातील तरुणाईत आता आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता वाढत आहे. नोकरी, व्यवसाय, भविष्यातील आर्थिक स्थैर्य आणि कर्ज व्यवहारांमुळे क्रेडिट स्कोअरवर (CIBIL Score) विशेष लक्ष दिलं जातं. हेच स्कोअर आता लग्न जुळवताना जोखण्याचं नवं मापदंड बनू लागलं आहे.
कुंडलीसोबत CIBIL चीही चौकशी!
पूर्वी जशी मुला-मुलींच्या कुंडल्या जुळवून त्यांची ग्रह दशा पाहिली जात असे, तशीच आज क्रेडिट इतिहासाची चौकशी केली जाते. सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असल्यास, काही कुटुंबं थेट लग्नास नकार देत आहेत. कारण कमी स्कोअर म्हणजे कर्जफेडीचा अडथळा, बेजबाबदार आर्थिक सवयी आणि अशाश्वत आर्थिक स्थिती – असं गृहीत धरलं जातं.
वाढती आकडेवारी काय सांगते?
एका अहवालानुसार, सध्या सुमारे 20 ते 35 टक्के तरुण-तरुणी लग्नाआधी एकमेकांचा CIBIL स्कोअर तपासत आहेत. यात महिला अधिक सजग दिसत असून, 25 ते 30 टक्के महिला फक्त सिबिल स्कोअरवरून लग्नाचा निर्णय घेत आहेत. अनेक ठिकाणी कमी स्कोअरमुळे नाते नाकारले गेल्याची उदाहरणंही समोर आली आहेत.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील मुर्तिजापूरमध्ये एका तरुणीने मुलाचं CIBIL स्कोअर 650 च्या खाली असल्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तर कर्नाटकातील मैसूरमध्ये एका कुटुंबाने सिबिल स्कोअर कमी निघाल्यामुळे लग्न मोडण्याचं ठरवलं.
हे पण वाचा : गणपती दर्शन ते ज्योतिर्लिंग यात्रा, धार्मिक स्थळांसाठी स्वारगेटहून सुरू खास बससेवा!
आजच्या काळात CIBIL स्कोअर म्हणजे एखाद्याच्या आर्थिक वर्तनाचं आरसंच. बँक कर्ज देताना जसे ते पाहतात, तसेच आता वैयक्तिक आयुष्यातील मोठे निर्णय – जसं की लग्न – घेताना सुद्धा हे बघितले जात आहे.
स्वतःचा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काय करावं?
कर्ज वेळेवर फेडणं
क्रेडिट कार्डचा शिस्तबद्ध वापर
अनावश्यक लोन टाळणं
आर्थिक नियोजन ठाम ठेवणं
