June 19, 2026

गणपती दर्शन ते ज्योतिर्लिंग यात्रा, धार्मिक स्थळांसाठी स्वारगेटहून सुरू खास बससेवा!

0
MSRTC Special Buses

MSRTC Special Buses

MSRTC Special Buses : पुणेकरांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) एक चांगली बातमी आली आहे. धार्मिक पर्यटनाची आवड असलेल्या प्रवाशांसाठी स्वारगेट आगाराकडून चार विशेष एसटी बस सेवांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे आता पुण्याच्या परिसरातील नागरिकांना थेट आणि आरामदायी प्रवासात राज्यातील अनेक पवित्र धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे.

हे पण वाचा : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! रेल्वेत चोरी-छेडछाड थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

स्वारगेट आगाराकडून जुलै महिन्यात चार प्रमुख विशेष बस टूर आयोजित करण्यात आल्या आहेत. या सर्व सहली ‘निमआराम’ या वातानुकूलित आणि आरामदायी एसटी बसने पार पडणार आहेत. विशेष म्हणजे या सहलींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन अतिशय विचारपूर्वक करण्यात आले आहे.

१९ ते २१ जुलै दरम्यान “पाच ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा” सुरू होत असून यात भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी-वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही महाराष्ट्रातील पवित्र ज्योतिर्लिंग स्थळे समाविष्ट आहेत. ही तीन दिवसांची यात्रा धर्माभिमानी प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

यानंतर २२ व २३ जुलैला गाणगापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर ही धार्मिक स्थळे कव्हर करणारी दोन दिवसांची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. गुरुदेव दत्त आणि श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ही संधी पुणेकरांसाठी पर्वणीच ठरेल.

२५ व २६ जुलै रोजी अष्टविनायक दर्शनासाठीही विशेष टूर नियोजित असून मोरगाव, थेूर, सिद्धटेक, पाली, महाड, लेण्याद्री, ओझर व रांजणगाव या आठ गणपती स्थळांना भेट देण्यात येणार आहे. या दर्शन यात्रेमुळे गणेशभक्तांची इच्छा एका प्रवासातच पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा : पुण्यात दुसरे विमानतळ होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

शेवटी, ३० जुलै रोजी रायगड दर्शनासाठी एक दिवसाची टूर ठेवण्यात आली आहे. शिवप्रेमींसाठी रायगड म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचा किल्ला आणि ही यात्रा त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा अभिमान निर्माण करणारी ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading