रिलायन्स शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, आता BUY करावे का? जाणून घ्या कारणं
Reliance Share Buy Rating
Reliance Share Buy Rating : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ-उताराचं वातावरण आहे. शुक्रवारी, 18 जुलै 2025 रोजी सेन्सेक्स 501 अंकांनी घसरून 81,757 वर स्थिरावला, तर निफ्टीही 143 अंकांनी खाली येऊन 24,968 च्या पातळीवर बंद झाला. या मंद वातावरणातही एका मोठ्या भारतीय कंपनीच्या शेअरने तग धरली आहे – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL).
हे पण वाचा : FD पेक्षा भरघोस! SBI बँकेचा शेअर देणार 24.54% रिटर्न, गुंतवणूकदारांना संधी
शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सचा शेअर केवळ -0.03% नी घसरून 1,476 रुपयांवर बंद झाला. दिवसाची सुरुवात 1,484.80 रुपयांनी झाली होती आणि तो दिवसभर 1,469.10 – 1,484.80 या रेंजमध्ये ट्रेड करत राहिला. गेल्या ५२ आठवड्यांत याच शेअरने 1,593.90 रुपयांचा उच्चांक आणि 1,114.85 रुपयांचा नीचांक गाठलेला आहे.
या सर्व संख्यात्मक माहितीत आणखी एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे – ग्लोबल ब्रोकरेज फर्म नुवामा (Nuvama Institutional Equities) कडून रिलायन्स इंडस्ट्रीजला ‘Buy’ रेटिंग मिळालं असून, त्यांचं टार्गेट प्राईस आता ₹1,720 वर नेण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की सध्याच्या पातळीवरून या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 16.5% पर्यंतचा नफा मिळू शकतो, असं नुवामाचं मत आहे.
नुवामाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, कंपनीच्या दूरसंचार, रिटेल आणि एनर्जी विभागातील भक्कम वाढीचा अंदाज लक्षात घेता रिलायन्सचे आर्थिक निकाल पुढील तिमाहीत अजून दमदार असू शकतात. त्याचबरोबर, जिओ फायबर व 5G क्षेत्रात रिलायन्सचे आघाडीचे स्थान व ग्राहकवर्गात होणारी वाढ हे घटकही लक्षवेधी आहेत.
हे पण वाचा : टाटा समूहाच्या TTML शेअरचा मोठा इतिहास! घसरणीनंतर गुंतवणुकीची संधी की धोका?
रिलायन्सचा एकूण मार्केट कॅप सध्या ₹19.97 लाख कोटींच्या आसपास आहे. ही कंपनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावाजलेली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने विविध क्षेत्रांत विस्तार करत मजबूत पाय रोवले आहेत.
