June 17, 2026

237 रुपयांचा शेअर 355 रुपयांवर! GNG इलेक्ट्रॉनिक्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं

0
GNG Electronics IPO

GNG Electronics IPO

GNG Electronics IPO : गुंतवणुकीच्या बाजारात आज एक मोठा धमाका घडला. जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा आयपीओ जेव्हा शेअर बाजारात लिस्ट झाला, तेव्हा तो सरळ 355 रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजे, ज्यांनी अवघ्या 237 रुपयांना शेअर घेतला होता, त्यांना पहिल्याच दिवशी तब्बल 50% चा नफा मिळाला. बाजारात अशा प्रकारचा उत्साह फार क्वचितच दिसतो.

हे पण वाचा : 1.57 रुपयांवर ट्रेड करणाऱ्या ‘या’ पेनी स्टॉकमध्ये अजून ताकद आहे का? 109% रिटर्ननंतर ‘Hold की Sell?

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सने देशांतर्गत शेअर बाजारात आपल्या प्रवासाची सुरुवात आज (30 जुलै 2025) केली. या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांच्या प्रचंड प्रतिसादामुळे 150 पट ओव्हरसबस्क्राइब झाला होता. हीच गोष्ट लिस्टिंगच्या दिवशी स्पष्ट दिसली. बीएसईवर शेअर 350 रुपयांवर तर एनएसईवर 355 रुपयांवर लिस्ट झाला.

मात्र, या सुरुवातीच्या तेजीनंतर थोड्याच वेळात शेअरचा भाव खाली घसरला. एनएसईवर तो 328.77 रुपयांवर आला. तरीसुद्धा सुरुवातीचे लिस्टिंग गेन पाहता गुंतवणूकदारांना 38% पेक्षा जास्त नफा मिळाल्याचे पाहायला मिळाले.

कंपनीचा IPO कसा होता?

जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सचा 460 कोटी रुपयांचा आयपीओ 23 ते 25 जुलै दरम्यान खुला होता. यामध्ये 400 कोटींचे नवीन शेअर तर उर्वरित 25.50 लाख शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकले गेले. या IPO मध्ये मिळालेला पैसा मुख्यत्वे कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. कंपनी आणि तिच्या उपकंपनीवर मिळून सुमारे 320 कोटींचं कर्ज आहे.

2006 साली स्थापन झालेली जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स ही लॅपटॉप, डेस्कटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रिफर्बिशिंग सेवा पुरवते. म्हणजे, जुनी उपकरणं दुरुस्त करून त्यांना पुन्हा वापरण्यायोग्य बनवते. कंपनी ‘इलेक्ट्रॉनिक्स बाजार’ या ब्रँडखाली काम करते आणि भारतासह अमेरिका, युरोप, यूएई व आफ्रिकेत तिचा व्यवसाय पसरलेला आहे.

हे पण वाचा : ‘या’ सरकारी शेअरमध्ये प्रचंड घसरण! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?

कंपनी HP, Lenovo, Microsoft यांसारख्या नामवंत ब्रँडसोबत काम करते. तसेच विजय सेल्ससारख्या मोठ्या विक्रेत्यांना बायबॅक आणि ई-कचरा व्यवस्थापन सेवा पुरवते. तिचं नेटवर्क सध्या 38 देशांमध्ये असून, 4,000 पेक्षा जास्त टचपॉइंट्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading