काय सांगता? फक्त ‘या’ एका कारणामुळे मुंबईतील तरुणीने नाकारली अमेरिकेतील ६४ लाखांची नोकरी
Mumbai Girl US Job Rejection
Mumbai Girl US Job Rejection : मुंबईतील केवळ २५ वर्षांची अनहद नावाची तरुणी सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. कारणही तसेच अनोखे – तिने अमेरिकेतील तब्बल ६४ लाख वार्षिक पॅकेज असलेली नोकरी नाकारली आणि भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामागचं कारण आणि प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा : तिशीनंतर मिळतो राजयोग! ‘या’ तारखेला जन्मलेल्यांचं नशीब चमकतं; जगतात एकदम राजेशाही थाटात
अनहदने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, जो पाहता पाहता व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या पगाराचा, मासिक खर्चाचा आणि संपूर्ण करिअर प्रवासाचा दिलखुलास पद्धतीने उल्लेख केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार सध्या ती भारतात राहून दरमहा सुमारे २.६७ लाख रुपये कमवते.
अनहदचा प्रवास सुरू झाला तो २०२४ मध्ये पदवी मिळाल्यानंतर. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत ती न्यू यॉर्कला गेली. सुरुवातीला तिला कोणतीही पेड नोकरी मिळाली नाही, म्हणून ती एका भारतीय किराणा दुकानात विनामोबदला इंटर्नशिप करत होती. येथे तिने ब्रँडिंग व मार्केटिंगसंबंधी अनुभव घेतला.
काही महिन्यांनी तिला एका एजन्सीत २० डॉलर प्रति तास दराने नोकरी मिळाली. पण न्यू यॉर्कसारख्या महागड्या शहरात तो पगार पुरेसा नव्हता. नंतर एका कंपनीत तिला वार्षिक ६०,००० डॉलर म्हणजेच सुमारे ५१ लाखांचा पगार मिळाल्यानंतरही तिला मानसिक समाधान वाटले नाही. घराच्या भाड्यापासून ते रोजच्या खर्चापर्यंत सगळंच अवघड जात होतं.
एप्रिल २०२४ मध्ये तिला एका नामांकित कंपनीतून ७५,००० डॉलर म्हणजेच सुमारे ६४ लाखांची ऑफर मिळाली. ही संधी अनेकांसाठी आयुष्यातील सर्वोच्च क्षण असतो. पण अनहदसाठी हा निर्णय अधिक विचारपूर्वक होता. वाढता मानसिक ताण, व्हिसासंबंधी अडचणी आणि एकाकीपणामुळे तिने ती नोकरी नाकारली आणि भारतात परत येण्याचा निर्णय घेतला.
भारतात परतल्यानंतर तिच्या कंपनीने तिचा अनुभव लक्षात घेऊन रिमोट वर्कची संधी दिली. तिला भारतीय बाजारासाठी सुसंगत पॅकेज मिळालं – वार्षिक ४० लाख रुपये. आता ती मुंबईत राहूनच जगातील कंपन्यांसाठी काम करत आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे – मानसिक समाधानात आहे.
