तिशीनंतर मिळतो राजयोग! ‘या’ तारखेला जन्मलेल्यांचं नशीब चमकतं; जगतात एकदम राजेशाही थाटात
Shani Dev Blessings
Shani Dev Blessings : जन्मतारीख आणि ग्रहांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, यावर आजही अनेक जण विश्वास ठेवतात. विशेषतः ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात सांगितले जाते की प्रत्येक मूलांकाचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्यापैकी एक अत्यंत प्रभावशाली आणि विशेष मूलांक म्हणजे मूलांक ८. या मूलांकाच्या लोकांवर शनीदेवाची विशेष कृपा असते, असे मानले जाते.
शनी ग्रह हा न्यायप्रिय, कर्मठ पण कर्मावर भर देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे या ग्रहाचा प्रभाव असलेल्या लोकांचे जीवन सुरुवातीला संघर्षमय असले तरी नंतर त्यांचे भाग्य उजळते. मूलांक ८ म्हणजेच ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेले लोक – हे शनीच्या विशेष प्रभावाखाली येतात.
या लोकांचे जीवन सुरुवातीला थोडे खडतर असते. संघर्ष, अपयश, आर्थिक अडचणी यांच्याशी सामना करत ते पुढे जातात. परंतु, एकदा का त्यांनी योग्य दिशा आणि संयम राखला, तर हे लोक राजेशाही थाटात जगतात. यांचे आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्य यामुळे ते समाजात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात.
शनी हा ग्रह धीम्या गतीने चालतो, म्हणूनच या लोकांना यश हळूहळू मिळतं. पण एकदा का ते यशाच्या उंबरठ्यावर पोहोचले, की मग त्यांचं जीवन बदलतं. वयाच्या तिशीनंतर किंवा चाळीशीनंतर त्यांच्या मेहनतीचं खरं फळ त्यांना मिळतं. त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थैर्य लाभतं.
मूलांक ८ चे लोक अत्यंत मेहनती, स्पष्टवक्ते, आणि धैर्यशील असतात. संकटं आली तरी ते कधीही हार मानत नाहीत. याच जिद्दीच्या जोरावर ते मोठे उद्योगपती, नेते, अधिकारी किंवा समाजातील प्रभावशाली व्यक्ती होतात.
हे पण वाचा : सकाळी उपाशीपोटी केली खाल्ली तर शरीरात काय घडतं? वाचा आश्चर्यजनक परिणाम
त्यांचं धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही विशेष आकर्षण असतं. शनीदेवाच्या कृपेने त्यांचे मनोबल सतत उंच राहते. हे लोक फक्त स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या मदतीसाठी देखील ओळखले जातात.
