October 30, 2026

भाविकांसाठी आनंदाची बातमी! तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी नवा मार्ग! ‘या’ शहरांमधून धावणार खास एक्सप्रेस गाड्या

0
Tirupati Balaji Special Train

Tirupati Balaji Special Train

Tirupati Balaji Special Train : तिरूपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दररोज देशभरातून या पवित्र स्थळी गर्दी करत असतात. विशेषतः महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने भक्त तिरूपतीला जातात. आता या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने तिरूपतीकडे जाणाऱ्या अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली असून, नव्या गाड्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

हे पण वाचा : लालबाग राजा’च्या चरणी माथा टेकत केडियांचा राज ठाकरेंना खुला इशारा; म्हणाले, “मी मराठी शिकणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा…”

अकोला-तिरूपती विशेष गाडीला वाढलेली मुदत

अकोला येथून सुटणारी विशेष गाडी क्रमांक ०७६०६ ही पूर्वी २९ जून २०२५ पर्यंतच धावणार होती. मात्र आता तिची मुदत ६ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही गाडी दर रविवारी सकाळी ८.१० वाजता अकोलाहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता तिरूपतीला पोहोचते. त्याचप्रमाणे तिरूपतीहून परतीसाठी गाडी क्रमांक ०७६०५ ही शनिवार दुपारी १२.३० वाजता सुटते आणि रविवारी दुपारी १.१५ वाजता अकोल्यात पोहोचते. या फेऱ्यांना आता २७ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

नांदेड-तिरूपती मार्गावर नवी विशेष रेल्वे सेवा

हजारो भाविक असलेल्या मराठवाड्यातून, विशेषतः नांदेडहून तिरूपतीकडे जाण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत. ०७१८९ नांदेड-तिरूपती ही गाडी ४ जुलै ते २५ जुलै दरम्यान दर शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता तिरूपतीला पोहोचेल.

तिरूपतीहून परतीसाठी ०७१९० ही गाडी ५ जुलै ते २६ जुलै दरम्यान दर शनिवारी दुपारी २.२० वाजता निघेल आणि रविवारी सकाळी ९.३० वाजता नांदेडला पोहोचेल.

त्याचबरोबर, ०७०१५ नांदेड-तिरूपती ही शनिवार दुपारी ४.५० वाजता सुटणारी गाडी ५ जुलैपासून सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता तिरूपतीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास ०७०१६ या गाडीमार्फत होणार आहे, जी दर रविवारी दुपारी ४.४० वाजता तिरूपतीहून निघेल आणि सोमवारी दुपारी १.१५ वाजता नांदेडमध्ये पोहोचेल. या दोन्ही गाड्यांच्या १६ फेऱ्या नियोजित आहेत.

हे पण वाचा : पालक-विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे 8 आणि 9 जुलै रोजी सर्व शाळा बंद राहणार

अमरावतीकरांसाठीही दिलासादायक सेवा

अमरावतीकर भाविकांसाठी देखील १२७६६ अमरावती-तिरूपती ही आठवड्यातून दोनदा धावणारी एक्सप्रेस सेवा उपलब्ध आहे. ही गाडी अमरावतीहून सोमवार व गुरुवारी धावत असून, तिरूपतीहून परतीची गाडी १२७६५ मंगळवार व शनिवारी चालवली जाते.

रेल्वेचा भाविकांसाठी मोठा निर्णय

या विशेष रेल्वेगाड्यांमुळे तिरूपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यात्रा सुलभ आणि सुरक्षित व्हावी, गर्दी टळावी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यामुळे भाविकांनी आता लवकरात लवकर तिकीट आरक्षित करून आपली धार्मिक यात्रा साजरी करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply