October 29, 2026

सात वेळा राष्ट्रीय सन्मान! महाराष्ट्रातील ‘या’ साखर कारखान्याचा अभूतपूर्व विक्रम; वाचा कोणता तो कारखाना?

0
Best Cooperative Sugar Mill

Best Cooperative Sugar Mill

Best Cooperative Sugar Mill : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानास्पद क्षण… भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एकदा देशपातळीवर आपली पताका फडकवली आहे. २०२३-२४ या हंगामासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (नवी दिल्ली) यांच्यातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार या कारखान्याने सातव्यांदा पटकावला आहे.

हे पण वाचा : भाविकांसाठी आनंदाची बातमी! तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी नवा मार्ग! ‘या’ शहरांमधून धावणार खास एक्सप्रेस गाड्या

या गौरवपूर्ण पुरस्काराचे वितरण केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाला. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्यात विविध राज्यांतील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बांभनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, हरयाणाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद शर्मा, उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, तसेच फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदींचा समावेश होता.

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले की, “गेल्या आर्थिक वर्षात आमच्या कारखान्याने ऊस उत्पादकता, साखर उतारा, वित्तीय शिस्त, कर्ज परतफेड, खर्च नियंत्रण, वेळेवर ऊसदर अदा अशा अनेक क्षेत्रात उच्च दर्जा राखला. ही एक एकात्मिक व पारदर्शक कार्यपद्धतीच यशाचे रहस्य आहे.”

ही यशस्वी वाटचाल शक्य झाली ती संस्थापक आणि माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळेच. त्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांचे काटेकोर व्यवस्थापन आणि ऊस उत्पादक सभासदांचा विश्वास – या सगळ्यांचे एकत्रित योगदान हेच या सातत्यपूर्ण यशामागचे खरे कारण ठरले.

हे पण वाचा : लालबाग राजा’च्या चरणी माथा टेकत केडियांचा राज ठाकरेंना खुला इशारा; म्हणाले, “मी मराठी शिकणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा…”

भीमाशंकर साखर कारखाना आजपर्यंत १३ राष्ट्रीय आणि १६ राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. या एकूण २९ पुरस्कारांमध्ये सात वेळचा ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ सन्मान ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे. देशातील अन्य कोणत्याही सहकारी साखर कारखान्याला ही कामगिरी साधता आलेली नाही.

Leave a Reply