June 15, 2026

नर्गिस फाखरीला मृतदेहांचं मांस खायला सांगितलं? वाचा तिच्या भयावह स्वप्नांची थरकाप उडवणारी कहाणी!

0
Nargis Fakhri Haunted House

Nargis Fakhri Haunted House

Nargis Fakhri Haunted House : एक अभिनेत्री म्हणून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरी हिने नुकतेच एक धक्कादायक आणि गूढ अनुभव सांगितले आहेत. भारतात आल्यावर सुरुवातीच्या काळात ती ज्या घरात राहायला गेली होती, त्या घरात घडलेल्या विचित्र आणि भयावह घटनांमुळे ती अक्षरशः हादरली होती. केवळ तीन दिवसांत तिने ते घर सोडण्याचा निर्णय घेतला, कारण ती मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ लागली होती.

हे पण वाचा : महायुती सरकारचा कडक निर्णय! ‘हे’ शेतकरी आता ब्लॅक लिस्टमध्ये; वाचा नेमकं प्रकरण काय?

नर्गिस सांगते, “मुंबईत स्वतःच्या मेहनतीने घेतलेलं माझं पहिलं घर हिल रोडवर एका स्मशानभूमीच्या जवळ होतं. तिथे राहायला सुरुवात केल्यावर लगेच मला विचित्र स्वप्नं पडायला लागली. एक सहा फूट उंच, पांढरे कपडे घातलेला माणूस मला दररोज स्वप्नात स्मशानभूमीत नेत असे. तो तिथे जमिनीतून मृतदेह काढून त्यावरचं मांस खात असे आणि मलाही खायला लावत असे. हे इतकं वास्तव वाटायचं की झोपेतून घाबरून जागं व्हायचं.”

सतत या अनुभवाने त्रस्त झाल्यावर तिने तो अपार्टमेंट तातडीने सोडलं. मात्र इतक्यावर गोष्ट थांबली नाही. सामानाची आवर्तने करताना तिला कपाटाजवळ सहा मृत पक्षी आढळले, ज्यामुळे तिच्या मनात अजूनच भीती निर्माण झाली. “हे सगळं इतकं विचित्र आणि अकल्पनीय होतं की माझं डोकंच फिरून गेलं. मी लगेच माझ्या टीमला दिल्लीला शिफ्ट व्हायला सांगितलं,” असं ती म्हणते.

हे पण वाचा : भारताकडून 336 धावांनी लाजिरवाणा पराभव… तरीही स्टोक्सचा माज काही कमी नाही; म्हणाला…

नर्गिसचा जन्म अमेरिकेत झाला असून तिचे वडील पाकिस्तानी आणि आई अमेरिकन आहेत. ती केवळ सहा वर्षांची असताना तिच्या आईवडिलांमध्ये घटस्फोट झाला. यानंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनयाकडे वळत भारतात करिअर घडवण्यासाठी पाऊल टाकलं. इम्तियाज अली यांच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटातून तिने पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर नेलं.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading