रात्री गॅसवर मीठ टाकल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे; ‘हा’ जुगाड एकदा नक्की करून पाहा!
How to Clean Gas Stove
How to Clean Gas Stove : घरकामात व्यग्र असलेल्या महिलांसाठी एक भन्नाट उपाय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. रोजच्या स्वयंपाकानंतर गॅस शेगडीवर साचलेले दूध, तेलाचे डाग, सांडलेले पाणी यामुळे शेगडी चिकट होते, रंगही पडतो. दररोज हे स्वच्छ करणं शक्य नसतं. मात्र, एका गृहिणीने सोशल मीडियावर शेअर केलेला छोटासा उपाय सध्या लाखो लोक आजमावत आहेत – आणि त्याचे परिणाम पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
रात्री झोपण्याआधी गॅसवर फक्त थोडंसं मीठ टाका आणि सकाळी साफ करताना काय चमत्कार होतो ते स्वतः पाहा. कुठलाही महागडा क्लिनर वापरण्याची गरज नाही, ना केमिकल्सचा त्रास. फक्त स्वयंपाक झाल्यावर गॅस बंद करा, त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि नंतर सगळीकडे सढळ हाताने मीठ टाका. हे मीठ तसंच सुमारे १५ मिनिटं किंवा रात्रभर ठेवा.
सकाळी उठल्यावर सुक्या कापडाने किंवा जुन्या कपड्याने गॅस पुसून टाका. जिथं-जिथं डाग साचलेले असतील तिथं हे मीठ त्यावर चांगलं काम करतं. तेलकटपणा, दूधाचे डाग, सांडलेली भाजी – सगळं काही सहज निघून जातं. विशेष म्हणजे, गॅसची झाकणं आणि बाजूचे पॅनेलही एका वाफेसारखे स्वच्छ दिसतात.
गॅस साफ करायला कोणकोणते महागडे साबण, जेल्स, लिक्विड क्लिनर वापरावे लागतात, हे गृहिणींना माहीतच आहे. पण दररोज ते वापरणं कठीण आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे हा “गॅसवर मीठ टाका” हा जुगाड आता अनेक घरात वापरला जात आहे. काही महिलांनी तर यामुळे महिन्याला क्लिनिंग प्रॉडक्ट्सवर होणारा खर्चही वाचल्याचं सांगितलं आहे.
