October 30, 2026

बैलाऐवजी स्वतः नांगर ओढणाऱ्या शेतकऱ्याला सोनू सूदची मदत; ‘ही’ गोष्ट देण्याचे दिले आश्वासन

0
Sonu Sood Helps Farmer

Sonu Sood Helps Farmer

Sonu Sood Helps Farmer : लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात घडलेली एक हृदयस्पर्शी घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडत आहे. वयाची ७५ पार केलेले पवार दाम्पत्य, आपली शेती कसण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने, बैलाऐवजी स्वतःच औत ओढून रानात राबताना दिसले. हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही तासांतच हजारो लोकांच्या काळजाला भिडला.

हे पण वाचा : रात्री गॅसवर मीठ टाकल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे; ‘हा’ जुगाड एकदा नक्की करून पाहा!

या दाम्पत्याकडे ट्रॅक्टर तर दूरच, पण दोन बैलही परवडण्याची सोय नाही. परिणामी, हक्काची शेती कसण्यासाठी वृद्ध शेतकरी स्वतःच नांगराला जुंपला गेला, आणि पत्नी त्याला साथ देताना दिसली. मागील ५० वर्षांपासून ही जोडी शेतीशी निष्ठा बाळगून आहे. मात्र आज वयाच्या अखेरीसही त्यांचं शेत जगवण्यासाठी ते अक्षरशः जीवाच्या आकांताने मेहनत करत आहेत.

या व्हिडिओने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले. ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली. कृषी विभागाने तत्काळ मदतीची घोषणा केली. ओळखपत्रे बनवण्यापासून ते सवलतीत कृषी उपकरणे देण्याची प्रक्रिया सुरू झाली.

मात्र या घटनेनंतर ज्या गोष्टीने सर्वसामान्यांची मने जिंकली, ती होती बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची प्रतिक्रिया. ट्विटरवर सूदने म्हटलं, “त्या शेतकऱ्यांचा नंबर द्या, मी बैल पाठवतो!” या छोट्याशा वाक्यातूनही सोनू सूदची संवेदनशीलता आणि मदतीसाठी तत्परता स्पष्ट झाली.

या ट्विटनंतर अनेकांनी अभिप्राय देताना, बैलाऐवजी ट्रॅक्टरची गरज असल्याचे म्हटले. त्यावर सोनू सूदने स्पष्ट केले की, “शेतकरी बांधवाला ट्रॅक्टर चालवता येत नाही, त्यामुळे बैलच योग्य ठरतील.” त्याच्या या प्रत्युत्तरावरही लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

हे पण वाचा : पावसाळ्यात सापांना आकर्षित करतात ‘ही’ २ झाडं, ९९% घरांमध्ये असतातच; वाचा महत्वाची माहिती

दरम्यान, कृषी विभागानेही पुढे येत, १.२५ लाख रुपयांची मदत व एक ट्रॅक्टर पुरवण्याची घोषणा केली आहे. प्रशासनाच्या या हालचालींमुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ही घटना ग्रामीण भागातील वास्तवाची व समाजातील विषमता उघड करणारी आहे.

Leave a Reply