पावसाळ्यात सापांना आकर्षित करतात ‘ही’ २ झाडं, ९९% घरांमध्ये असतातच; वाचा महत्वाची माहिती
Viral News
Viral News : सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असतानाच ग्रामीण व शहरी भागात सापांच्या उपस्थितीची प्रकरणं वाढत आहेत. अशातच एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे — तुमच्या घराजवळ असलेली दोन विशिष्ट झाडं सापांना घरात येण्याचं निमंत्रण देऊ शकतात. आणि विशेष म्हणजे ही झाडं 100 पैकी 99 टक्के घरांमध्ये सहज आढळतात!
पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी भरते आणि त्यांना सुरक्षित, उबदार जागेचा शोध लागतो. त्यामुळे हे प्राणी माणसाच्या निवासाजवळील जागी येतात. अशावेळी घराच्या आजूबाजूला गवत वाढलेलं असेल, अनावश्यक वस्तू पडून असतील किंवा घराजवळ खास करून ‘केवड्याचं’ किंवा ‘चाफ्याचं’ झाड असेल, तर साप घरात शिरण्याची शक्यता अधिकच वाढते.
केवड्याचं झाड — सापांचं ‘हॉटस्पॉट’
केवडा हे झाड दिसायला सुगंधी व आकर्षक असलं तरी सापांना हे झाड विशेष प्रिय असतं. कारण या झाडाच्या मुळ्यांभोवती व आसपास ओलसरता, गडद सावली आणि निवारा मिळतो. याच कारणामुळे साप या झाडाजवळ आश्रय घेतात. काही सर्पमित्रांच्या अनुभवातूनही हे स्पष्ट झालं आहे की घराजवळ केवड्याचं झाड असल्यास सापांचे ‘व्हिजिट्स’ वाढतात.
चाफ्याचं झाड — पक्ष्यांची घरटी आणि सापांचा शिकार
दुसरं झाड म्हणजे चाफा. हे झाड सुद्धा सौंदर्य आणि सुगंधासाठी घराजवळ लावलं जातं. पण मोठ्या चाफ्याच्या झाडावर पक्ष्यांची घरटी असतात. या घरट्यांमध्ये असलेली अंडी किंवा पिल्लं सापांसाठी भक्ष्य ठरतात. परिणामी, साप झाडावर किंवा झाडाजवळ सहजपणे येतात. शिवाय, चाफ्याच्या झाडाभोवती जर अडचण असलेली जागा असेल, जसे की दगड, माती, गवत किंवा झाडाच्या मुळांमध्ये फडकी, तर साप लपण्यासाठी त्या जागेचा वापर करतो.
सर्पदंशाच्या घटनांमध्ये पावसाळ्यात वाढ होते, हे वास्तव आहे. पण यापासून वाचण्यासाठी घाबरून न जाता सजग राहणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. ‘बिग फोर’ विषारी सापांची ओळख, त्यांच्या वावराच्या शक्यतांबाबत जागरूकता आणि घराच्या आजूबाजूच्या निसर्गाशी जबाबदारीने वागणं ही काळाची गरज आहे.
