धक्कादायक बातमी! कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार; खलिस्तानी दहशतवाद्याचा कट?
Kapil Sharma Cafe Firing
Kapil Sharma Cafe Firing : भारताचा लोकप्रिय हास्यकलाकार कपिल शर्मा सध्या धक्क्यात आहे. कॅनडात नुकतेच सुरू केलेल्या त्याच्या ‘Kap’s Café’ या उपक्रमावर थेट गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडाली असून, प्रकरण फक्त गुन्हेगारीपुरते मर्यादित न राहता थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित असल्याचं स्पष्ट होतंय.
हा गोळीबार एका पूर्वनियोजित कटाचा भाग होता, आणि त्यामागे खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा हात असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या संघटनेशी संबंधित हरजीत सिंग उर्फ लाड्डी यानेच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे हा लाड्डी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या मोस्ट वाँटेड यादीत आहे आणि तो सध्या जर्मनीत वास्तव्यास आहे.
कपिल शर्माने काही आठवड्यांपूर्वीच आपली पत्नी गिन्नी चतरथसोबत Kap’s Café सुरू केलं होतं. या ठिकाणी १० ते १२ गोळ्यांचा मारा करण्यात आला. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
हरजीत सिंग लाड्डीचा संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI सोबत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. लाड्डी हा बब्बर खालसाच्या जागतिक फंडिंगसह अमेरिकेपासून युरोपपर्यंतच्या कारवाया पाहतो. एप्रिल २०२४ मध्ये विकास प्रभाकर नामक VHP नेत्याच्या हत्येप्रकरणात त्याच्यावर १० लाखांचं बक्षीस जाहीर झालं होतं.
हे पण वाचा : पुणेकरांनो, तयार राहा! स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला मिळाली गती
बब्बर खालसा ही संघटना १९७८ मध्ये स्थापन झाली असून, खलिस्तानच्या मागणीसाठी ती अनेक हिंसक घटनांमध्ये सहभागी राहिली आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि युरोपियन युनियनने तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. या संघटनेचा मुख्य सूत्रधार पाकिस्तानातूनच सर्व कारवाया नियंत्रित करतो, असा संशय आहे.
कॅफेवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असून, कपिल शर्मा व त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारत सरकारकडूनही प्रकरणाची बारकाईने माहिती घेतली जात असून, NIA लाड्डीविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
