October 31, 2026

पुण्यात परवडणाऱ्या घरांना जोरदार प्रतिसाद, मे महिन्यात विकली गेली तब्बल ‘इतकी’ घरे; आकडा वाचून व्हाल थक्क

0
Affordable Housing Pune

Affordable Housing Pune

Affordable Housing Pune : पुण्यात घर खरेदी करणाऱ्यांचा कल आता परवडणाऱ्या घरांकडे स्पष्टपणे झुकलेला दिसतो आहे. मे महिन्यात शहरात एकूण ११ हजार ९३० घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद झाली असून, त्यातील जवळपास निम्मे व्यवहार ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे आहेत. त्यामुळे पुणेकरांची पसंती ही स्वप्नवत नव्हे तर वास्तववादी घरांवर असल्याचे स्पष्ट होते.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी! ‘या’ महिलांना 1500 रुपये परत करावे लागणार; आदिती तटकरे यांचा मोठा खुलासा!

नाइट फ्रँक इंडियाने नुकताच सादर केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात घरांच्या विक्रीत १७ टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेतही ही संख्या कमी आहे. एप्रिलमध्ये १४,४२१ व्यवहार झाले होते, तर मेमध्ये हे प्रमाण ११,९३० वर आले. म्हणजेच विक्रीसह मुद्रांक शुल्क संकलनातही मोठी घट नोंदवली गेली आहे – एप्रिलमध्ये ५४७ कोटींच्या तुलनेत मेमध्ये केवळ ४२१ कोटी रुपयेच शासकीय तिजोरीत जमा झाले.

या व्यवहारांपैकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे, तर २५ ते ५० लाखांदरम्यानच्या घरांचे प्रमाण २९ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचा अर्थ, पुण्यातील ४९ टक्के व्यवहार हे ५० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांचे आहेत. याउलट, १ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांना फारशी मागणी नसून अशा व्यवहारांचे प्रमाण केवळ १ टक्क्याच्या आसपासच आहे.

विशेष म्हणजे, जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत पुण्यात एकूण ९९ हजार ३३९ घरांचे व्यवहार झाले आहेत, जे गेल्या वर्षी याच कालावधीतील ८५ हजार २९० व्यवहारांपेक्षा १६ टक्क्यांनी अधिक आहेत. मुद्रांक शुल्क संकलनातही २० टक्क्यांची वाढ झाली आहे – गेल्या वर्षी ३,०७९ कोटींच्या तुलनेत यंदा ३,६८७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

हे पण वाचा : पुणेकरांनो! अमित शहा पुणे दौऱ्यावर; ‘या’ रस्त्यांवर वाहनांची बंदी, वाहतुकीत मोठे बदल

या पार्श्वभूमीवर, पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात ग्राहकांचा कल हा वास्तव जाणणारा आहे. विशेषतः मध्यमवर्ग आणि नोकरदार वर्ग आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या घरांवर भर देत आहेत. यामुळे बिल्डर आणि विकसकांनीही आपल्या प्रोजेक्ट्समध्ये परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाइट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, “मे महिन्यात एकूण विक्रीत घट झाली असली तरी जानेवारी ते मे दरम्यानची एकूण कामगिरी समाधानकारक आहे. विशेषतः १ ते ५ कोटी रुपयांच्या घरांमध्ये मागणी कमी झाली आहे, हे लक्षवेधी आहे.”

Leave a Reply