October 29, 2026

6 महिने दारू न घेतल्यास शरीरात नेमके कोणते बदल होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

0
No Alcohol For Six Months Benefits

No Alcohol For Six Months Benefits

No Alcohol For Six Months Benefits : दारू हानिकारक आहे हे आपण अनेकदा ऐकतो. पण खरंच जर एखाद्या व्यक्तीने दारू पूर्णपणे सोडली, तर त्याचे परिणाम केवळ शरीरापुरते मर्यादित राहत नाहीत, तर मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यातही अमूल्य बदल घडतात. पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, फक्त सहा महिने दारूपासून दूर राहिलं, तरी आयुष्याचा दर्जा आमूलाग्र बदलतो.

हे पण वाचा : गोव्याहून पुण्याला येताना विमानात घडलं भयंकर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

डॉ. अनिकेत मुळे (इंटर्नल मेडिसिन तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, मिरा रोड) यांच्यानुसार, “दारू सोडल्यावर लगेचच सकारात्मक परिणाम दिसू लागतात. झोप सुधारते, ऊर्जा वाढते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. यकृत जर खराब झाले असेल, तरी त्याची झीज हळूहळू भरून येते.” ते पुढे म्हणाले, “मानसिक आरोग्यही सुधारते. माणूस अधिक शांत, केंद्रित आणि भावनिकदृष्ट्या स्थिर होतो.”

या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नातेसंबंध सुधारतात. कारण व्यक्ती भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या जवळच्या लोकांसाठी ‘उपलब्ध’ राहतो. संवाद सुलभ होतो, गैरसमज दूर होतात आणि नात्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. सहा महिन्यांत तयार होणारी मानसिक शिस्त आणि स्वअनुशासन यामुळे व्यक्ती आयुष्यात मोठे निर्णय अधिक ठामपणे घेऊ लागतो.

डॉ. कुशल बांगड, (सल्लागार डॉक्टर, एआयएमएस हॉस्पिटल, डोंबिवली) म्हणतात, “दारू फक्त यकृतावर नाही तर संपूर्ण शरीरावर घातक परिणाम करते. हृदयविकार, स्ट्रोक, उच्च रक्तदाब, पचन बिघडणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे यासारख्या अनेक त्रासांची सुरुवात दारूपासून होते. दारू सोडली तर हे सारे धोके टाळता येतात.”

हे पण वाचा : सोने पुन्हा तेजीत! ९८ हजारांच्या घरात भाव; जाणून घ्या आजचे नवीन दर?

ते अधिक सांगतात, “दारू न घेतल्यामुळे मूड स्थिर राहतो, आत्मविश्वास वाढतो, आणि जवळच्या लोकांसोबतचं बंध अधिक मजबूत होतो. दारू सोडणं केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे.”

तज्ज्ञांचं म्हणणं एकदम स्पष्ट आहे – दारू सोडली तर यकृताचा कर्करोग टाळता येतोच, पण त्यासोबतच आयुष्यभर टिकणाऱ्या गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करता येतो.

Leave a Reply