October 29, 2026

पुण्याच्या वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडवर तडाखा! फक्त ३१ चेंडूत ठोकल्या ८६ धावा, पट्ठ्यान मैदान गाजवून टाकलं

0
Vaibhav Suryavanshi Batting

Vaibhav Suryavanshi Batting

Vaibhav Suryavanshi Batting : पुण्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू आणि अंडर-19 टीम इंडियाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडच्या भूमीत आपल्या आक्रमक खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचून अपयशी ठरलेला वैभव, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. त्याने केवळ ३१ चेंडूत ८६ धावांची तुफानी खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली.

हे पण वाचा : 6 महिने दारू न घेतल्यास शरीरात नेमके कोणते बदल होतात? ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ४० षटकांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट्स गमावून २६८ धावा केल्या होत्या. नियमित कर्णधार आयुष म्हात्रे अनुपस्थित असल्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी अभिज्ञान कुंडूवर सोपवण्यात आली होती. सलामीला मैदानात उतरलेल्या अभिज्ञान आणि वैभव यांनी जलद सुरुवात दिली. त्यांनी पहिल्या ४ ओव्हरमध्ये ३८ धावांची भागीदारी करत टीम इंडियाला भक्कम सुरुवात करून दिली.

अभिज्ञान बाद झाल्यानंतर वैभवने ‘टॉप गिअर’मध्ये फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने फक्त ३१ चेंडूंमध्ये ८६ धावा ठोकत २७७.४२ च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त खेळ केला. यामध्ये त्याने ९ षटकार आणि ६ चौकार लगावले. विशेष म्हणजे या ८६ पैकी तब्बल ७८ धावा फक्त सीमारेषा ओलांडूनच मिळवल्या.

वैभवची खेळी केवळ वैयक्तिक विक्रमापुरती मर्यादित नव्हती. त्याने भारताच्या विजयासाठी स्वतःच्या शतकाची पर्वा न करता धावांची झंझावाती लय निर्माण केली. विहान मल्होत्रासोबत २३ चेंडूत ७३ धावांची वीजवेगाने भागीदारी करत सामन्याचा पूर्ण रंगच बदलून टाकला. दुर्दैवाने, वैभव आठव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. मात्र तोपर्यंत तो संघासाठी बहुमोल कामगिरी करून गेला होता.

हे पण वाचा : गोव्याहून पुण्याला येताना विमानात घडलं भयंकर; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

आता उर्वरित फलंदाजांवर विजयाचे ओझे आहे. भारताला २-१ अशी आघाडी घेण्यासाठी आणखी काही झुंजार खेळींची गरज आहे. पुण्यातून घडणारा हा तरुण खेळाडू भविष्यात भारतासाठी मोठी संपत्ती ठरणार हे नक्की!

वैभव सूर्यवंशीची ही खेळी केवळ आकड्यांत मोजता येणार नाही; ती आहे एक ‘स्टेटमेंट’ – भारताच्या युवा क्रिकेटमधील उदयोन्मुख तेजाचा स्फोट.

Leave a Reply