सरकारी नोकरीची मोठी संधी! वीज वितरण कंपनीत 180 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
MSEDCL Recruitment 2025
MSEDCL Recruitment 2025 : वीज वितरण क्षेत्रातील राज्यातील सर्वोच्च संस्था असलेल्या महावितरणमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. BE किंवा B.Tech केलेल्या अभियंत्यांना उच्च पगाराची आणि सरकारी सेवेत स्थैर्य मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल १८० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना दरमहा ७३,५८० रुपयांपासून ते थेट १,६६,५५५ रुपये पर्यंत वेतन मिळू शकणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत होणार आहे – प्रथम संगणकीकृत परीक्षा आणि नंतर मुलाखत. परीक्षा पूर्णपणे स्पर्धात्मक असून त्यामध्ये तांत्रिक ज्ञानाबरोबरच बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी भाषेचे मूल्यमापन केले जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी भरपूर अभ्यास करून तयारी करणे आवश्यक ठरणार आहे.
पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल शाखेतील पदवी असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा पदाच्या स्वरूपानुसार ३५ ते ४० वर्षांपर्यंत असून, आरक्षणानुसार काही सवलती दिल्या जाणार आहेत. या भरतीमुळे विशेषतः पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेतलेल्या तरुण अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
महावितरणमधील सेवा म्हणजे केवळ नोकरी नाही, तर एक सामाजिक बांधिलकी आहे. वीज वितरणाच्या क्षेत्रात तांत्रिक कौशल्य वापरताना राज्यातील लाखो ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे समाधान या पदांद्वारे मिळते. याशिवाय, उत्तम वेतन, पदोन्नतीच्या संधी, आणि स्थिर भविष्य हेही मोठे फायदे आहेत.
हे पण वाचा : 6 महिने दारू न घेतल्यास शरीरात नेमके कोणते बदल होतात? ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल. ‘नवीन नोंदणी’ करून खाते तयार केल्यानंतर अर्ज भरणे, फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे, शुल्क भरून अंतिम सबमिशन करणे असे टप्पे पार करावे लागतील. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची छायांकित प्रत सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
