लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून जूनचे पैसे खात्यात जमा होणार; आदिती तटकरे यांनी दिली माहिती
Majhi Ladki Bahin June Installment
Majhi Ladki Bahin June Installment : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जून महिन्याचा सन्मान निधी थांबलेला असल्यामुळे अनेक महिलांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, आता राज्य सरकारने निधीच्या अडचणीवर मात करत जूनचा हप्ता वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
हे पण वाचा : प्रवाशांसाठी वाईट बातमी; रेल्वे स्थानकावरील वडापाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला
आदिती तटकरे यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. उद्यापासून आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होईल,” असे त्या म्हणाल्या.
योजनेसाठी आवश्यक निधी नसल्यामुळे जून महिन्याचा हप्ता थांबवावा लागला होता. यावर तोडगा काढत सरकारने अनुसूचित जाती घटकांसाठी असलेल्या ४१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वळवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो महिलांना दिलासा मिळाला आहे.
तटकरे पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद फुलवण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी ठरतो आहे.”
हे पण वाचा : १००० कोटींचं घर! मुंबईतल्या ‘या’ विभागात झाली ऐतिहासिक खरेदी, पाहा कोणी केलं खरेदी?
अपात्र महिलांवर कारवाई
दरम्यान, योजनेचा गैरवापर करणाऱ्या महिला लाभार्थींवर सरकारने कारवाई केली आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या २,२८९ महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. योजना फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरीब आणि गरजू महिलांसाठी असल्याने, ही कारवाई आवश्यक असल्याचे मंत्री तटकरे यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.
