October 29, 2026

पुणेकरांसाठी खुशखबर! हडपसर, बाणेर, वाघोलीला मिळणार थेट बस सुविधा

0
Pune Pmpml New Routes

Pune Pmpml New Routes

Pune Pmpml New Routes :  पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे त्रास सहन करावा लागत असतानाच, एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) प्रशासनाने शहर आणि उपनगरांतील प्रवाशांसाठी १५ नवीन बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात हे मार्ग प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता असून, यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल होणार आहे.

हे पण वाचा : 5,285 घरांची म्हाडाची बंपर लॉटरी सुरू! ‘या’ अ‍ॅपवर अर्ज करा आणि घराचे स्वप्न पूर्ण करा

सध्या पीएमपीएमएलच्या सुमारे ४०२ मार्गांवर दररोज ११ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र, काही भागांत अजूनही थेट बससेवा उपलब्ध नाही किंवा खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहने किंवा महागड्या रिक्षांचा आधार घ्यावा लागत होता. हीच गरज ओळखून पीएमपी प्रशासनाने प्रवाशांकडून थेट सूचना मागवून, जनसंवादातून नव्या मार्गांची आखणी केली आहे.

या नव्या मार्गांची आखणी करताना काही जुन्या आणि प्रवाशांचा प्रतिसाद न मिळालेल्या मार्गांना बंद करण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गांसाठी सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यांची यादी व वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. हे मार्ग विशेषतः शहराच्या उपनगरांतील हडपसर, औंध, बाणेर, वाघोली, कात्रज आदी भागांना अधिक चांगल्या सेवा देतील, अशी माहिती आहे.

पीएमपीमध्ये गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाच्या सुधारणांना सुरुवात झाली आहे. अध्यक्ष दीपा मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण वाढवले असून, हलगर्जीपणा करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभाग प्रमुखांना ‘आगार पालक अधिकारी’ अशी नवी जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी थेट प्रवाशांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत.

हे पण वाचा : पुण्यात दुसरे विमानतळ होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

प्रत्येक बुधवारी ‘जनसंवाद दिवस’ राबवला जात आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी बसने प्रवास करत प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत आणि नागरिकांच्या तक्रारी, सूचना ऐकून निर्णय घेत आहेत. नव्या मार्गांची निवडही अशाच प्रतिक्रिया आणि स्थानिक गरजांनुसार करण्यात आली आहे.

दुसरीकडे, सध्याचा पावसाळा आणि वाढलेली वाहतूक कोंडी यामुळे पीएमपीच्या अनेक बस विलंबाने धावत आहेत. काही बस तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्या वाटेत बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर नवे मार्ग आणि सुधारित नियोजन हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Leave a Reply