पेट्रोलपंप मालकाला 1 लिटर पेट्रोलमागे किती कमिशन मिळतं? आकडा ऐकून थक्क व्हाल!
Petrol Pump Dealer Commission
Petrol Pump Dealer Commission : पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की गाडीला ब्रेक मारावा की नाही, असा प्रश्न प्रत्येक वाहनधारकाला पडतो. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण भरत असलेल्या प्रत्येक लिटर पेट्रोलमागे त्या पंप मालकाची नेमकी कमाई किती होते? अनेकदा असं वाटतं की पंप मालक प्रचंड पैसा कमावत असावा. पण प्रत्यक्षात त्यांचं आर्थिक गणित किती काटेकोर आहे हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
हे पण वाचा : हडपसर-यवत, चाकण महामार्ग रुंदीकरणाला गती; तब्बल ६२५० कोटींचा निधी जाहीर!
राष्ट्रीय राजधानी दिल्लीसारख्या शहरात एक लिटर पेट्रोल विकल्यावर पंप मालकाला सरासरी ४.४० रुपये कमिशन मिळते. तर डिझेल विकल्यावर ही कमिशन रक्कम सरासरी ३.०३ रुपये इतकी असते. म्हणजे तुम्ही जेव्हा १,००० रुपयांचं पेट्रोल भरता, तेव्हा त्या व्यवहारातून संबंधित डीलरला केवळ सुमारे ४६ रुपयेच मिळतात!
ही आकडेवारी इंडियन ऑईल (IOCL), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांच्या अधिकृत वेबसाईट्सवरून मिळवलेली आहे. या कमिशनमध्ये कंपन्या वेळोवेळी थोडाफार बदल करत असतात. तसेच, राज्यागणिक करांची रचना आणि वाहतूक खर्च वेगवेगळा असल्याने डीलरचा प्रतिलिटर नफा प्रत्येक राज्यात थोडाफार बदलतो.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अनेक गोष्टींचा समावेश असतो – उदा. बेस प्राइस, एक्साइज ड्युटी, व्हॅट (VAT), ट्रान्सपोर्ट खर्च, आणि डीलर कमिशन. यामध्ये डीलरचा वाटा अत्यंत लहान आहे. समजा, दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९४.७७ रुपये असेल, तर त्यात डीलरचं कमिशन फक्त ४.४० रुपये असतं. उर्वरित रक्कम सरकारच्या कररचनेत आणि उत्पादन कंपन्यांच्या खर्चात जाते.
हे पण वाचा : ‘या’ वासाने साप 100 किलोमीटर दूर जातात! पावसाळ्यात ‘हाच’ आहे रामबाण उपाय; वाचा सविस्तर
त्यामुळे ‘पेट्रोलपंप म्हणजे सोन्याचं खाण’ अशी सर्वसामान्य धारणा खरी ठरत नाही. कारण इतक्या कमी कमिशनमध्ये देखील डीलरला कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल, यंत्रणांची देखभाल, सुरक्षा खर्च, पाणीपुरवठा, वायफाय, सीसीटीव्ही अशा अनेक गोष्टींचं व्यवस्थापन करावं लागतं.
पंपमालकांची कमाई इंधन विक्रीपुरती मर्यादित नसते. नायट्रोजन एअर, तेल, कूलंट, गाडी धुण्याच्या सेवा, अॅक्सेसरी विक्री, मिनरल वॉटर आणि इतर सेवा देऊनही काही अतिरिक्त उत्पन्न ते मिळवत असतात.
