October 30, 2026

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! या दिवशी पुण्यातील पाणी पुरवठा राहणार बंद!

0
Punelive24 (3)

पुणे- पुण्यात गुरुवारी (३ एप्रिल) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातल्या जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या आणि पंपिंग स्टेशनवर विद्युत आणि बांधकामाची काही कामं होणार असल्यामुळे हा निर्णय घेतलाय.

त्यामुळे शहराच्या मध्यभागातल्या पेठा आणि बहुतांश उपनगरांमध्ये गुरुवारी पाणी येणार नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (४ एप्रिल) पाणी येईल, पण कमी दाबाने, असं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितलंय.

या बंदचा परिणाम शहराच्या बऱ्याच भागांवर होणार आहे. पर्वती परिसरात सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, चिंतामणी नगर, लेक टाऊन, सॅलिसबरी पार्क, आंबेडकर नगर, प्रेम नगर, कोंढवा खुर्द, साईबाबा नगर, अप्पर आणि लोअर इंदिरानगर यांचा समावेश आहे.

वडगाव जलकेंद्राच्या भागात सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक, सहकारनगर, आंबेडकरनगर, टिळकनगर, दाते बसस्टॉप, कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, टेल्को कॉलनी, कोंढवा गाव, येवलेवाडी, टिळेकरनगर, संतोषनगर, सुखसागरनगर, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर परिसरातही पाणी बंद राहील.

भामा आसखेड जलकेंद्र परिसरात लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी यांच्यावर परिणाम होईल.

तर वारजे जलकेंद्र आणि गांधी भवन टाकी परिसरात पाषाण, भूगाव रोड, मधुबन सोसायटी, कोकाटे वस्ती, बावधन, भुसारी कॉलनी, चिंतामणीनगर, गुरू गणेशनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, मोहन नगर, सूस रोड, भारतीनगर, शास्त्रीनगर, परमहंस नगर, कुंभारवाडी, काकडे सिटी, सिप्ला फाउंडेशन, वारजे माळवाडी, पॉप्युलर कॉलनी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, कोथरूड वॉर्ड ऑफिस, शांतिवन, गांधी स्मारक भवन, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मुंबई-पुणे महामार्ग, कर्वेनगर गावठाण, तपोधाम, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड यांचाही समावेश आहे.

पॅनकार्ड क्लब परिसरात बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपॉईंट रोड, विजयनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण, शाहू कॉलनी, इंगळे नगर, वारजे जकातनाकाही प्रभावित होणार आहेत.

एसएनडीटी परिसरात गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, रेव्हेन्यू कॉलनी, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, हॅपी कॉलनी, मेघदूत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, आयडियल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, खैरेवाडी, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, वेदांतनगरी, सहवास, क्षिप्रा, करिष्मा सोसायटी, डी.पी. रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणा, दशभुजा गणपती ते म्हात्रे पूल, मंगेशकर हॉस्पिटल परिसरातही पाणी बंद राहील.

चतुःशृंगी परिसरात औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, सकाळनगर, चव्हाणनगर, संकल्प पार्क, अभिमान श्री सोसायटी, औंध गाव आणि जुने-नवीन होळकर, खराडी पंपिंग, लष्कर जलकेंद्र परिसरात मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट, एमईएस, एचई फॅक्टरी, रामटेकडी

तसेच सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वेस्ती, आनंदनगर, हडपसर गावठाण, साततवाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बी.टी.कवडे रोड, कोरेगाव पार्क, ओरिएंटन गार्डन, महंमदवाडी रस्ता, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, रेसकोर्स, कॅम्प, ससून, खराडी गावठाण, विश्रांतवाडी, विमाननगर, संजय पार्क, कळस यांच्यावरही परिणाम होणार आहे.

पुणेकरांनी गुरुवारी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि शुक्रवारी कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची तयारी ठेवावी, असं आवाहन महापालिकेने केलंय.

Leave a Reply