पुण्यात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार हजर!
पुणे- येत्या ४ आणि ५ एप्रिलला एक मोठी कार्यशाळा होणार आहे. राज्यभरातून जिल्हाधिकारी आणि मोठे अधिकारी जमणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ही दोन दिवसांची बैठक बोलावलीय. या कार्यशाळेत राज्य सरकारच्या धोरणांचं काय झालं आणि ते गावापासून जिल्ह्यापर्यंत कसं पोहोचलं, यावर सगळे मिळून चर्चा करणार आहेत.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सोबतच राज्यातील सगळे विभागीय आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक संचालक, जमाबंदी आयुक्त, महसूल विभागाचे अपर आयुक्त, सहसचिव, उपसचिव आणि सगळ्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तसंच अतिरिक्त जिल्हाधिकारीही हजर राहणार आहेत.
ही कार्यशाळा बालेवाडीच्या द ऑर्किड हॉटेलमध्ये होणार आहे. यात राज्याच्या मोठ्या धोरणांचा स्थानिक पातळीवर कसा उपयोग होईल, यावर भर दिला जाणार आहे.
उद्घाटनाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींसोबतच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही असतील. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अधिकारी आपापल्या भागात राबवलेल्या योजनांचं सादरीकरण करतील.
नव्या कल्पना मांडतील आणि त्यावर सगळ्यांनी मिळून विचार करून चर्चा होईल. जिल्हा आणि विभागीय पातळीवर प्रशासन कसं आणखी चांगलं करता येईल, यावरही मन मोकळं होणार आहे. महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा आहे, त्यामुळे या कार्यशाळेचे परिणाम राज्यभर दिसतील, असं वाटतंय.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारचे मोठे कार्यक्रम पुण्यात होतायत. लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक यासारखे कार्यक्रम इथेच झाले.
पुण्यात चांगल्या सुविधा, सोयीचं स्थान आणि प्रशासकीय महत्त्व यामुळे सरकारचं लक्ष इथे आहे. या कार्यशाळेतूनही राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा आहे.
