पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण; मुंबई, पुण्यात दर किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Price Maharashtra
Petrol Diesel Price Maharashtra : राज्यातल्या सर्वसामान्यांना थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. कारण ४ जुलै २०२५ रोजी जाहीर झालेल्या इंधन दरांमध्ये थोडी घसरण झाल्याचे दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये रोज सकाळी सहा वाजता बदल होतो. त्यानुसार आज महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.
महागाईच्या झळा सोसत असलेल्या जनतेसाठी इंधन दरातला हा बदल महत्त्वाचा मानला जातो. मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांपासून ते लातूर, नांदेड, चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांपर्यंत पेट्रोल-डिझेलची किंमत आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतेय.
हे पण वाचा : २५ वर्षांनी झी मराठीवर कमबॅक! ‘ही’ अभिनेत्री पुन्हा मालिका गाजवण्यासाठी सज्ज
मुंबईमध्ये आज पेट्रोल १०३.५० रुपये तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर १०४.१४ आणि डिझेलचा दर ९०.६७ रुपये आहे. तर नांदेड, परभणी, बीड, सिंधुदुर्ग यांसारख्या ठिकाणी पेट्रोलचा दर १०५.५० रुपयांवर स्थिर आहे.
अमरावती, कोल्हापूर, जळगाव, उस्मानाबाद याठिकाणीही पेट्रोल-डिझेलचे दर १०५ रुपये च्या आसपास आहेत. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर १०४.३२ तर डिझेलचा दर ९०.८७ आहे.
या दरांमध्ये होणाऱ्या चढ-उतारामागे काही विशिष्ट कारणं असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील हालचाल, स्थानिक कर, वाहतूक खर्च, व्हॅट अशा विविध घटकांवर दर ठरतो. त्यामुळं एका राज्यात किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दर वेगळे असतात.
पेट्रोल आणि डिझेल हे केवळ वाहनधारकांसाठी नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे दरवाढ झाली की महागाई वाढते आणि दर घसरले की किंचित दिलासा मिळतो.
दरम्यान, नागरिकांना आपापल्या शहरातील दर समजण्यासाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने एसएमएस सेवा देखील सुरु केली आहे. त्यासाठी ग्राहकांनी RSP किंवा HPPRICE या कोडसह डीलर कोड लिहून ठराविक क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे.
उदाहरणार्थ, IOC ग्राहकांनी RSP <डीलर कोड> हा मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवायचा आहे. HPCL साठी ९२२२२०११२२ आणि BPCL साठी ९२२३११२२२२ हे क्रमांक उपलब्ध आहेत.
