June 17, 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 66 वैद्यकीय जागांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ! वाचा सविस्तर

0
PCMC Medical Recruitment 2025

PCMC Medical Recruitment 2025

PCMC Medical Recruitment 2025 : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना एक दिलासादायक संधी मिळाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी एकूण ६६ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. खास करून कनिष्ठ निवासी, सी.एम.ओ., पोस्टमॉर्टम शिफ्ट ड्युटीवरील अधिकारी आणि ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी (BTO) या पदांसाठी ही भरती होत आहे.

हे पण वाचा : 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पाहून आजही अनेकांची झोप उडते; काजोल-संजयचा ‘हा’ सिनेमा पाहिलात का?

आरोग्य विभागात नोकरीची वाट पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. पिंपरी, पुणे या ठिकाणी ही पदं भरणार असल्याने पुणे परिसरातील उमेदवारांसाठी ही भरती अधिकच फायदेशीर ठरू शकते.

या भरतीमधील विशेष बाब म्हणजे, निवड झालेल्या एमबीबीएस उमेदवारांना दरमहा ₹७५,००० इतके मानधन देण्यात येणार आहे. तर संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या पदविका (डिप्लोमा) धारकांना दरमहा ₹८०,००० पर्यंत वेतन मिळणार आहे. अशा उच्च मानधनाच्या संधी फारशा वेळोवेळी मिळत नाहीत.

हे पण वाचा : २५ वर्षांनी झी मराठीवर कमबॅक! ‘ही’ अभिनेत्री पुन्हा मालिका गाजवण्यासाठी सज्ज

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून २ जुलै २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अर्ज करण्यासाठी केवळ ८ जुलै २०२५ पर्यंतची मुदत असल्याने इच्छुक उमेदवारांनी त्वरा करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading