बजाजच्या दोन नव्या बाईक्स लाँच! फीचर्स, किंमत आणि नवा राइडिंग अनुभव जाणून घ्या?
Bajaj Dominar 2025 launch
Bajaj Dominar 2025 launch : जर तुम्ही सध्या एक दमदार, स्टायलिश आणि प्रवासयोग्य बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बजाज ऑटोने दिलेली ही भेट तुमच्यासाठीच आहे. बजाजने आपली लोकप्रिय डोमिनार रेंज नव्या स्वरूपात सादर केली आहे. ‘2025 डोमिनार 400’ आणि ‘डोमिनार 250’ या दोन नव्या मॉडेल्स नुकत्याच भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्या असून, दमदार फिचर्स आणि अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने परिपूर्ण अशा या बाईक्स आता अधिक पॉवरफुल आणि प्रवासासाठी योग्य बनल्या आहेत.
हे पण वाचा : लाडकी बहिण योजनेतून हजारो महिलांची नावे वगळली! तुमचं नाव अजून आहे का? लगेच तपासा
किंमत आणि रेंज
डोमिनार 250 ची एक्स-शोरूम किंमत 1.92 लाख रुपये असून डोमिनार 400 ची किंमत 2.39 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाईक्स लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या असून, त्यामध्ये नव्या अॅक्सेसरीज, डिजिटल फीचर्स आणि रायडिंग अनुभव समृद्ध करणारे अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत.
फीचर्समध्ये क्रांतिकारक बदल
डोमिनार 400 मध्ये ‘राइड-बाय-वायर’ तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे चालकाला ‘रोड’, ‘पाऊस’, ‘स्पोर्ट’ आणि ‘ऑफ-रोड’ असे चार वेगवेगळे रायडिंग मोड्स मिळतात. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडीवर आधारित आहे. दुसरीकडे, डोमिनार 250 मध्ये चार ABS आधारित रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत, जे मेकॅनिकल थ्रॉटल बॉडीवर काम करतात.
बाईकच्या एकंदर डिझाइनमध्ये फारसा बदल दिसून येत नसला, तरीही हँडलबार डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे लांब प्रवासात हातांना अधिक आराम मिळतो. स्क्रीनवरील माहिती सूर्यप्रकाश किंवा पावसातही स्पष्ट दिसावी म्हणून ‘बॉन्डेड डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल’ देण्यात आले आहे. यामध्ये स्पीडो फ्लॅपही आहे.
हे पण वाचा : पुण्याच्या मानाच्या गणपतीसाठी मोठी बातमी! मंदिर संवर्धनासाठी ४० लाखांचा निधी
बाईकवर सहज नियंत्रण ठेवता यावे यासाठी नवीन स्विचगिअर (बटन सिस्टीम) बसवण्यात आले आहे. याशिवाय फॅक्टरी फिटेड GPS माउंट कॅरिअर्स, टूल किट्ससारख्या अॅक्सेसरीजचा समावेशही करण्यात आला आहे.
