June 15, 2026

बलेनो खरेदीसाठी सुवर्णसंधी! फक्त ₹1 लाख डाऊन पेमेंटमध्ये मिळवा नवी कार; जाणून घ्या किती येईल मासिक हप्ता?

0
Maruti Baleno EMI

Maruti Baleno EMI

Maruti Baleno EMI : भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मनात स्वतःची चारचाकी घेण्याचे स्वप्न असते. पण ते स्वप्न कधी कर्जाच्या गणितात अडकते, तर कधी वाढत्या महागाईच्या ओझ्याखाली गमावले जाते. मात्र सध्या कार कंपन्या अशा योजना घेऊन येत आहेत की ज्यामुळे कार घेणे जरा सोपे वाटते. याच पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी बलेनो ही हॅचबॅक कार सध्या विशेष गाजत आहे. कारण, ही कार फक्त १ लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटवर घेता येऊ शकते आणि त्यासाठी लागणारा मासिक हफ्ता सुद्धा अनेक कुटुंबांना सहज झेपेल असा आहे.

हे पण वाचा : एक वर्षात पैसे दुप्पट! रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर शेअर 500 रुपयांच्या दिशेने?

बलेनोची किंमत ६.७१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ती ९.९३ लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र, बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत सरासरी ७.६१ लाख रुपयांपर्यंत जाते. जर कोणी ग्राहक १ लाख रुपये डाऊन पेमेंट भरून उर्वरित रक्कम कर्जातून भरतो, तर ९.८ टक्के वार्षिक व्याजदर आणि ७ वर्षांच्या कर्ज कालावधीसाठी दरमहा सुमारे १०,९०३ रुपयांचा हप्ता भरावा लागतो. हा अंदाज ऑनलाईन ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार असून, बँकेनुसार ही रक्कम थोडीफार बदलू शकते.

या कारचा विचार करताना फक्त किमतीच्या गणितापुरतेच मर्यादित राहता येत नाही. कारण, बलेनो हे मॉडेल फिचर्सच्या बाबतीत देखील खूपच समृद्ध आहे. विशेषतः डेल्टा सीएनजी व्हेरिएंटसारखे मॉडेल घेतल्यास एकाच वेळी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही टाक्या भरल्यावर तब्बल १००० किलोमीटरहून अधिक अंतर पार करता येते. म्हणजेच मायलेजच्या बाबतीतही ही कार जबरदस्त ठरते.

हे पण वाचा : ‘या’ पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी! टार्गेट प्राईस थेट ३० रुपयांच्या दिशेने

बलेनोमध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमपासून हेड्स-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखी आधुनिक फिचर्स देण्यात आली आहेत. चालकाच्या सोयीसाठी हाइट अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्सही यात मिळतात. संगीतप्रेमींना लक्षात घेऊन Arkamys कंपनीच्या साउंड सिस्टीमची सुविधा देण्यात आली आहे.

इतक्या वैशिष्ट्यांसह आणि परवडणाऱ्या ईएमआय योजनेमुळे बलेनो आज अनेकांची पहिली पसंती ठरत आहे. गाडीच्या देखभालीचा खर्चही तुलनेत कमी असल्यामुळे ही कार शहरी आणि निमशहरी ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading