June 13, 2026

मोबाईल युजर्ससाठी धक्का! रिचार्जचे दर वाढणार, डेटा प्लॅनही होणार मर्यादित

0
Mobile Recharge Hike

Mobile Recharge Hike

Mobile Recharge Hike : दूरसंचार सेवांचा वापर आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. पण येत्या काळात मोबाईल वापरणं सामान्य ग्राहकासाठी अधिक महाग होणार आहे. कारण टेलिकॉम कंपन्या लवकरच आपल्या रिचार्ज प्लॅनचे दर १० ते १२ टक्क्यांनी वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महिन्यागणिक रिचार्ज करणाऱ्या लाखो ग्राहकांच्या खिशावर भार पडणार आहे.

हे पण वाचा : ‘या’ तारखेपर्यंत पाऊस नाही! हवामान विभागाने दिला मोठा अलर्ट

गेल्याच वर्षी कंपन्यांनी रिचार्ज दरात वाढ केली होती आणि आता पुन्हा एकदा दरवाढीची टांगती तलवार ग्राहकांवर लटकतेय. विशेषतः मे महिन्यात जिओ व एअरटेलने मोठ्या प्रमाणावर नवीन ग्राहक जोडले आणि त्याच दरम्यान कंपन्यांनी या दरवाढीचा विचार सुरू केला.

भारतात मे महिन्यात तब्बल ७४ लाख नवीन मोबाईल युजर्स वाढले. त्यातील ५५ लाख युजर्स एकट्या जिओत जोडले गेले. यामुळे जिओचा एक्टिव्ह युजर शेअर ५३% वर पोहोचला, तर एअरटेलचा वाटा ३६% पर्यंत वाढला. ही वाढ म्हणजेच टेलिकॉम कंपन्यांना दरवाढीसाठी मिळालेली ‘परवानगी’ असल्यासारखी स्थिती आहे. विश्लेषकांचं म्हणणं आहे की, युजर बेस वाढल्यावर कंपन्यांना महसूल वाढवण्याची संधी मिळते आणि दरवाढीचा निर्णय घेणं सोपं होतं.

डेटा वापरावरही नवे नियम?
फक्त रिचार्ज दरच नव्हे, तर आता तुमच्या डेटा वापरावरही कंपन्या बारीक लक्ष ठेवणार आहेत. ‘टायर्ड प्राइसिंग’ नावाचं धोरण येऊ घातलं आहे, ज्यात एका विशिष्ट मर्यादेनंतर अतिरिक्त डेटा वापरासाठी वेगळं शुल्क आकारलं जाणार आहे. म्हणजेच, “तुम्ही जितका डेटा वापराल, तितका अधिक पैसा द्यावा लागेल” असा थेट अर्थ.

स्वस्त आणि मर्यादित डेटा पॅक्स देण्याचंही नियोजन सुरू आहे. पण तेवढेच खर्चिक असतील, कारण वारंवार रिचार्ज करणं अपरिहार्य होईल. अनेक ग्राहकांसाठी हे आर्थिकदृष्ट्या मोठं आव्हान ठरणार आहे.

हे पण वाचा : सोने-चांदी दरात आज मोठा बदल! २४K ते १४K दर एका क्लिकवर जाणून घ्या

पोर्टिंगचा पर्याय, पण उपयोग किती?
दरवाढीमुळे काही ग्राहक पोर्टिंगचा पर्याय निवडू शकतात. पण सध्याची टेलिकॉम बाजाराची स्थिती पाहता, प्रमुख सेवा देणाऱ्या कंपन्यांकडेच ग्राहक वळले आहेत. व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकसंख्येत घसरण झाली असून, अनेक वापरकर्ते दुसऱ्या सिमऐवजी एकच सिम ठेवण्याच्या विचारात आहेत.

याचा थेट फायदा जिओ आणि एअरटेलसारख्या कंपन्यांना होतो आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा वाढत आहे आणि त्याचवेळी ग्राहकांसाठी पर्याय कमी होत चालले आहेत.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading