October 30, 2026

50 हजार डाउन पेमेंट भरुन घरी आणा Tata Nexon, जाणून घ्या EMI किती पडेल?

0
Punelive24 (7)

Tata Nexon EMI Plan | भारतीय ऑटोमोबाईल बाजारात Tata Nexon ही सर्वाधिक लोकप्रिय आणि सुरक्षित एसयूव्हींपैकी एक आहे. आधुनिक फीचर्स, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट सुरक्षितता ही या कारची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल पण एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरणे शक्य नसेल, तर फायनान्स प्लॅनद्वारे EMI वर ही कार खरेदी करता येऊ शकते. आज आपण जाणून घेऊया, फक्त 50,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार घेतल्यास EMI किती पडेल.

Tata Nexon ऑन-रोड किंमत आणि फायनान्स प्लॅन

दिल्लीत Tata Nexon Smart (पेट्रोल) व्हेरिएंटची ऑन-रोड किंमत सुमारे 8.99 लाख रुपये आहे. जर तुम्ही फक्त 50,000 रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर तुम्हाला उर्वरित रक्कम म्हणजेच 8.49 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.

हे लोन 9.8% वार्षिक व्याजदराने घेतल्यास आणि 4 वर्षांच्या मुदतीसाठी असेल, तर दरमहा सुमारे 21,459 रुपये EM भरावा लागेल. या कालावधीत व्याजासह एकूण रक्कम 10.30 लाख रुपये होईल. त्यामुळे एकूण हिशोब पाहता, EMI वर कार घेणे तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Tata Nexon ची पॉवरट्रेन आणि परफॉर्मन्स

Tata Nexon मध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 120 बीएचपी पॉवर आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करते. याशिवाय, 1.5-लिटर डिझेल व्हेरिएंटमध्ये 110 बीएचपी पॉवर आणि 260 एनएम टॉर्क मिळतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल तसेच AMT (ऑटोमॅटिक) ट्रान्समिशन पर्यायांसह येते. (Tata Nexon EMI Plan )

Tata Nexon मधील आकर्षक फीचर्स

ही एसयूव्ही केवळ परफॉर्मन्ससाठी नव्हे, तर प्रीमियम फीचर्ससाठीही प्रसिद्ध आहे. या कारमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.25 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, फास्ट यूएसबी चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि हाइट अॅडजस्टेबल सीट्स यांसारखी फीचर्स मिळतात. तसेच, अलॉय व्हील्स आणि अॅडव्हान्स्ड सेफ्टी फीचर्सही यात समाविष्ट आहेत.

Tata Nexon खरेदी फायदेशीर का ठरू शकते?

Tata Nexon ही भारतातील पहिली 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी SUV आहे. दमदार इंजिन, उत्कृष्ट मायलेज आणि अत्याधुनिक फीचर्समुळे बाजारात या कारची लोकप्रियता कायम आहे. जर तुम्हाला कमी डाउन पेमेंट आणि EMI वर ही कार घ्यायची असेल, तर फायनान्स प्लॅनचा पर्याय चांगला ठरू शकतो.

 

Leave a Reply