October 29, 2026

नवीन Tata SUV ‘या’ दिवशी करणार धमाकेदार एंट्री, पाहा कसा असणार परफॉर्मन्स?

0
Punelive24 (10)

Tata Curvv Dark Edition | टाटा मोटर्सची नवी Curvv Dark Edition SUV लाँचपूर्वीच डीलरशिपवर दिसली आहे, यामुळे तिच्या लॉन्चची उत्सुकता आणखी वाढली आहे. आधी ही कार IPL 2025 च्या सुरूवातीस लाँच होणार असल्याची चर्चा होती, पण काही कारणांमुळे उशीर झाला. आता Tata Motors लवकरच ही स्पेशल एडिशन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

Tata Curvv Dark Edition – काय नवीन आहे?

Curvv Dark Edition ही नियमित Curvv SUV च्या तुलनेत अधिक स्टायलिश आणि आकर्षक लुकसह येते. यामध्ये नवीन ब्लॅक एक्सटेरियर आणि ऑल-ब्लॅक अलॉय व्हील्स दिले आहेत. आतूनही गाडीला ऑल-ब्लॅक इंटीरियर थीम आणि ग्लॉसी ब्लॅक फिनिश मिळते.

यामध्ये फीचर्स पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले आहेत, त्यात –

12.3-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
पॅनोरामिक सनरूफ
ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम)
रिअर एसी व्हेंट्स आणि वेगवेगळे ड्राईव्ह मोड्स

या Dark Edition मध्ये एक नवीन अपडेट म्हणजे रिअर सनशेड्ससुद्धा सामील आहे, जे रेग्युलर Curvv मध्ये नव्हते. हा स्पेशल एडिशन फक्त Accomplished व्हेरिएंट मध्येच उपलब्ध होईल.

इंजिन आणि परफॉर्मन्स

यामध्ये दोन इंजिन पर्याय असतील –

1.2-लिटर Hyperion पेट्रोल इंजिन
1.5-लिटर Kryojet डिझेल इंजिन
7-स्पीड DCT गिअरबॉक्स

लॉन्च कधी होईल?

SUV ची डिलिव्हरी डीलरशिपला पोहोचू लागली असल्याने, Tata Motors ही कार लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करेल. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply