आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी? जाणून घ्या ९ जुलैचं संपूर्ण राशिभविष्य!
Today Horoscope
Today Horoscope : नवे आठवड्याचे दुसरेच दिवशी ग्रहांच्या संयोगामुळे आजच्या राशींच्या बाबतीत काहींच्या वाट्याला संधी, तर काहींसाठी सावधगिरीचा इशारा मिळतोय. अनेक राशींसाठी आजचा दिवस यश, कल्पकता आणि नवे निर्णय घेण्यास पोषक ठरणार आहे, तर काहींनी भावनांवर नियंत्रण ठेवणे, खर्चांवर लगाम घालणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशिभविष्य—
हे पण वाचा : आज भारत बंद! २५ कोटी कामगार संपावर, वाचा नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरु राहणार?
मेष (Aries)
आजचा दिवस नवी ऊर्जा घेऊन येणारा. जुन्या योजनांना पुन्हा एकदा गती मिळू शकते. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. कौटुंबिक तणाव मिटवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. आर्थिक स्थैर्य असूनही अनावश्यक खर्च टाळा.
वृषभ (Taurus)
भावनिक स्थिती आज थोडी अस्थिर राहू शकते. कोणत्याही गोष्टीचा विपरित अर्थ घेणे टाळा. नोकरीत ताण जाणवेल पण शेवटी सर्व काही सुरळीत होईल. लहान मुलांशी वेळ घालवणं मन शांत करेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
मिथुन (Gemini)
तुमच्या बोलण्यात आज जादू असेल. नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंध गोड राहतील. एखादं जुनी अडकलेली जबाबदारी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer)
घरातील जबाबदाऱ्या वाढतील आणि तणावही जाणवेल. खर्चात काटकसर गरजेची आहे. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. गप्पांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आहारात संतुलन ठेवणे आवश्यक.
सिंह (Leo)
यश, नाविन्य आणि निर्णय यांचा मिलाफ असलेला दिवस. कार्यालयात तुमची कल्पकता वाखाणली जाईल. जोडीदाराशी संवाद वाढवा, गैरसमज दूर होतील. आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्य सुधारेल.
कन्या (Virgo)
व्यवसायात आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. घरात शांतता आणि सकारात्मकता राहील. काही जुन्या आठवणी मनाला स्पर्श करतील, पण तुम्ही त्या भावनांवर मात कराल. आर्थिक बाजू भक्कम राहील.
तूळ (Libra)
थोडे अस्वस्थ वाटेल. कोणताही निर्णय घेण्याआधी शांतपणे विचार करा. प्रॉपर्टीबाबत लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना संयम आवश्यक. ध्यान, योगामुळे मानसिक स्थैर्य मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
तुमच्या सृजनशीलतेमुळे अडथळे दूर होतील. भावंडांशी मतभेद शक्य, पण संवादातून तोडगा निघेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी संधी आहेत. थंडीपासून सावधगिरी बाळगा, आरोग्याची विशेष काळजी घ्या.
धनु (Sagittarius)
उत्साही आणि ऊर्जावान दिवस. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षणात यश. प्रेमात तणाव संभवतो पण संवादाने नातं सुधारेल. आर्थिकदृष्ट्या संमिश्र परिणाम.
मकर (Capricorn)
आज कठोर परिश्रमाचा दिवस आहे. क्षमतेपेक्षा जास्त मेहनत लागेल. घरातील वृद्धांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामात अचूकता ठेवल्यास यश तुमचंच असेल. वेळेचा शहाणपणाने वापर करा.
हे पण वाचा : गड, धबधबे, धरणे! पर्यटकांना ठराविकच संख्येने प्रवेश, नवा नियम लागू होणार
कुंभ (Aquarius)
आत्मविश्वासाच्या जोरावर अडचणींवर मात कराल. जुने संबंध फायदेशीर ठरतील. नव्या गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक. मित्रांबरोबरचा वेळ मनाला हलकं करेल. झोप पूर्ण घ्या.
मीन (Pisces)
जबाबदाऱ्या वाढणार, पण तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. नोकरीत पदोन्नती किंवा प्रशंसेची शक्यता आहे. जोडीदाराशी मतभेद टाळा. मानसिक शांतीसाठी स्वतःला वेळ द्या आणि एखादा छंद जोपासा.
