पायलटला परफ्युम वापरता येत नाही? जाणून घ्या यामागचं धक्कादायक कारण!
Pilot Restrictions
Pilot Restrictions : विमानाचं उड्डाण म्हणजे केवळ यंत्रणांचं काम नाही, तर शेकडो जीवांचं सुरक्षित गंतव्यावर पोहोचणं हे त्यामागचं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं ध्येय असतं. यासाठी सर्वात मोठी जबाबदारी असते ती पायलटच्या खांद्यावर. उड्डाणादरम्यान त्याचं मन, शरीर आणि निर्णयक्षमता शंभर टक्के कार्यरत असणं अत्यावश्यक असतं. त्यामुळेच त्याच्या वापरातील काही अत्यंत सामान्य वाटणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आलेली असते.
हे पण वाचा : “म्हणून अजूनही आले नाहीत पैसे”? ‘लाडकी बहीण’ हप्त्याबाबत सरकारचा मोठा खुलासा
अनेकांना हे आश्चर्य वाटेल की, परफ्युम, माउथवॉश, टूथपेस्ट किंवा सैनिटायझर यांसारख्या रोजच्या वापरातल्या वस्तू पायलटसाठी का निषिद्ध असाव्यात? पण यामागे वैज्ञानिक कारणं आणि वैमानिक सुरक्षेचा गंभीर विचार आहे. विमान चालवताना पायलटची एकाग्रता व स्थिरता टिकून राहणं गरजेचं असतं. जर तो तीव्र वासाचा परफ्युम वापरत असेल, तर त्याचा वास इतका प्रभावी ठरू शकतो की, पायलटचं लक्ष क्षणभरासाठी का होईना, पण विचलित होऊ शकतं. हे विचलन संकट ओढवू शकतं.
अशा तीव्र वासामुळे काही प्रवाशांना श्वसनाचा त्रास, डोकेदुखी किंवा अॅलर्जीही होऊ शकते. विमानाच्या बंद, हवाबंद केबिनमध्ये सुगंध लवकर पसरतो आणि टिकतो. त्यामुळे अशा गोष्टींना पायलट आणि केबिन क्रूसाठी पूर्णतः मनाई आहे.
त्याशिवाय, पायलट आणि क्रू मेंबर्सना दरवेळी फ्लाइटच्या आधी ब्रेथ अॅनालायझर टेस्टला सामोरं जावं लागतं. ही टेस्ट त्याने अल्कोहोल सेवन केलं आहे का हे तपासते. मात्र, बहुतांश माउथवॉश, परफ्युम, टूथपेस्ट आणि हँड सैनिटायझर यामध्ये अल्कोहोलचा अंश लपलेला असतो. त्यामुळे अशा वस्तू वापरल्यास टेस्टमध्ये चुकीचा रिपोर्ट येण्याचा धोका असतो. जर चुकून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर संबंधित पायलटला निलंबन, आर्थिक नुकसान किंवा कारवाईला सामोरं जावं लागतं. त्यामुळे DGCA (डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) कडून अशा वस्तूंच्या वापरावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
फक्त परफ्युम किंवा सैनिटायझरच नव्हे, तर काही झोप येण्यासाठीची औषधं, सर्दी-खोकल्याची औषधं सुद्धा वापरण्यास बंदी असते. कारण यामुळे झोप येणे, प्रतिक्रिया वेळेत न देणे किंवा मनःस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
.
