October 29, 2026

“म्हणून अजूनही आले नाहीत पैसे”? ‘लाडकी बहीण’ हप्त्याबाबत सरकारचा मोठा खुलासा

0
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सहभागी असलेल्या अनेक महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून हप्त्यांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने संभ्रमात असलेल्या लाभार्थींना लवकरच एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, अशा महिलांच्या खात्यावर आता जून व जुलैचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा : विद्यार्थ्यांचा संताप उफाळला! पुणे विद्यापीठात आंदोलन, विद्यार्थ्यांनी तोडले बॅरिकेट्स

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, गरीब, घटस्फोटित, विधवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक आधार देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यभरात लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

मात्र मागील काही महिन्यांपासून योजनेच्या हप्त्यांच्या वितरणात काही अडथळे निर्माण झाले आहेत. मे महिन्याचा हप्ता उशिरा जूनमध्ये मिळाला, तर जून महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे अनेक लाभार्थींमध्ये चिंता आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक जणींना वाटू लागलं की, त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले का?

या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने स्पष्टीकरण दिलं असून सांगितलं की, काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता वेळेवर जमा होऊ शकलेला नाही. परंतु लाभार्थींनी घाबरून न जाता आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावं आणि काही दिवसांत रक्कम जमा झाली नसेल तर स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

दरम्यान, योजनेचा आतापर्यंत 12 हप्त्यांचा लाभ दिला गेलेला असून आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, प्रशासनाचे काम अंतिम टप्प्यात असून जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : व्हिडिओ व्हायरल झाला अन् पुण्यातील गुडलक कॅफे बंद! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, याबाबत प्रशासनाने स्पष्ट अटी दिल्या आहेत. 21 ते 60 वयोगटातील महिला, ज्यांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न ठरावीक मर्यादेत आहे, तसेच घटस्फोटित, विधवा किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना योजनेत प्राधान्य दिले जाते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या यादीत नाव असणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील आवश्यक आहे.

Leave a Reply