June 15, 2026

Samsung ला टक्कर! Vivo चा फोल्डेबल फोन भारतात दाखल, जाणून घ्या धमाकेदार फीचर्स आणि किंमत

0
Vivo X Fold 5

Vivo X Fold 5

Vivo X Fold 5 : भारतीय मोबाईल मार्केटमध्ये उच्च दर्जाच्या स्मार्टफोनच्या शर्यतीत एक नवा टप्पा गाठला गेला आहे. सॅमसंगनंतर आता विवोने देखील आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 5 भारतीय बाजारात सादर केला आहे. अत्याधुनिक फिचर्स, आकर्षक डिझाईन आणि दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर हा फोन बाजारात प्रवेश करत आहे. ज्यांना टेक्नोलॉजीप्रेमी आणि प्रीमियम फोन वापरण्याची आवड आहे, त्यांच्या साठी हा एक मोठा पर्याय ठरणार आहे.

हे पण वाचा : गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यापेक्षा ‘हा’ व्यक्ती आहे जास्त श्रीमंत; पण अजूनही जगासमोर चेहरा आला नाही

दोन स्क्रीन, अमेझिंग एक्सपीरियन्स

Vivo X Fold 5 मध्ये 8.03 इंचाचा फोल्ड होणारा मुख्य डिस्प्ले असून, त्यासोबतच 6.53 इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्क्रीन AMOLED असून, अल्ट्रा ब्राईटनेससह 4500 निट्स पर्यंतचा उजळपणा देतात. स्क्रीनच्या डिझाईनमुळे वाचताना, व्हिडीओ पाहताना किंवा गेम खेळताना एक वेगळीच अनुभूती मिळते.

वेगवान प्रोसेसर आणि ताकदवान बॅटरी

फोनमध्ये क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर आहे, जो प्रचंड वेग आणि स्मूद परफॉर्मन्स देतो. Android 15 वर आधारित FuntouchOS सिस्टिमसह येणाऱ्या या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ती 80W वायर्ड व 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. म्हणजेच, फक्त काही मिनिटांत फोन पुन्हा पूर्ण चार्ज होऊ शकतो.

Vivo X Fold 5 मध्ये मागच्या बाजूस तिप्पट 50MP चा कॅमेरा सेटअप आहे. मुख्य OIS कॅमेरा, अल्ट्रा वाइड आणि टेलीफोटो – हे तीनही कॅमेरे सुस्पष्ट आणि उच्च दर्जाचे फोटो टिपण्यासाठी सक्षम आहेत. तसेच, कव्हर आणि मुख्य डिस्प्लेमध्ये 20MP फ्रंट कॅमेरेही देण्यात आले आहेत – व्हिडिओ कॉलिंग व सेल्फीसाठी उत्तम.

हा फोन एकाच व्हेरिएंटमध्ये मिळतो – 16GB RAM आणि 512GB स्टोरेज. त्यामुळे जास्त डेटा ठेवायचा, हाय ग्राफिक्स गेम्स खेळायचे किंवा मल्टीटास्किंग करायची – कोणताही अडथळा येणार नाही.

हे पण वाचा : “म्हणून अजूनही आले नाहीत पैसे”? ‘लाडकी बहीण’ हप्त्याबाबत सरकारचा मोठा खुलासा

किंमत आणि उपलब्धता

Vivo X Fold 5 ची किंमत ₹1,49,999 इतकी आहे. हा फोन सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, 30 जुलैपासून Flipkart, Amazon आणि Vivo च्या अधिकृत स्टोअर्सवर विक्रीसाठी येणार आहे. यावर 15,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि जुन्या फोनच्या एक्सचेंजवरही अतिरिक्त बोनस मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading